Hardik-Natasha Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya And Ananya Pandey : घटस्फोट होताच हार्दिक पांड्याने 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला केलं फॉलो, अनंत- राधिकाच्या लग्नात दिसले होते एकत्र

Hardik Pandya And Ananya Pandey : घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि एक बॉलिवूड अभिनेत्री एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करीत आहेत. तेव्हापासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Chetan Bodke

गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा होत्या, अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. हार्दिक- नताशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेतल्यानंतर नताशा आपल्या मायदेशी परतली आहे. घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि एक बॉलिवूड अभिनेत्री एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करीत आहेत. तेव्हापासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे. अनंत- राधिकाच्या लग्नामध्ये हार्दिक आणि अनन्या जोरदार नाचले होते. त्यांच्या डान्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनंत- राधिकाच्या लग्नामध्ये हार्दिक एकटाच उपस्थित होता. टीम इंडियाने टी- २० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल्यानंतर नताशाने हार्दिकसाठी पोस्टही शेअर केली नव्हती. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

घटस्फोटानंतर हार्दिक आणि अनन्या एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करीत आहे. तेव्हापासूनच त्यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. अनंत- राधिकाच्या लग्नातील हार्दिक आणि अनन्याचा डान्स व्हिडिओपाहून अतिउत्साही नेटकऱ्यांनी "रब ने बना दी जोडी" अशी कमेंटही केली आहे.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. अनेक महिने त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT