Anand Dave Saam Tv
मनोरंजन बातम्या

हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ब्राम्हण महासंघाने राज ठाकरेंना केलं 'हे' आवाहन

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली (Marathi Movie) आहे. अखेर काल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे तर शरद केळकर यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटावर आता विरोध होताना दिसत आहे.

हर हर महादेव वर आमचा आक्षेप आहे. राजसाहेब (Raj Thackeray) आपण तरी आवाज देण्याआधी हा चित्रपट पाहिला आहे का असा सवाल ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी केला आहे. ज्या बाजीप्रभुनी शिवरायांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांच्या तोंडी महाराजांच्या प्रती आक्षेपार्ह वक्तव्य टाकली आहेत. तसेच कधी काळी त्यांनी महाराजांबरोबरच लढाई केली असंही या चित्रपटच्या ट्रेलर मधे दाखवलं आहे

मला एकाचा जीव घ्यायचा आहे त्याच नाव आहे. शिवाजी शहाजी भोसले हे वाक्य पण या चित्रपटात बाजीरावांच्या तोंडी आहे आणि अशी मानसिकता असलेल्या माणसांवर विश्वास ठेवून महाराज स्वराज्यची अपेक्षा ठेवून होते असं निर्मात्यांना सांगायचं आहे का असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वराज्याशी आमचा काहीच संबंध नाही असे वाक्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सर्व लोक वाचन करत नाहीत, अभ्यास करत नाहीत त्यामुळे लोक चित्रपटातील दृश्य खरी मानतात असे देखील आनंद दवे यावेळी म्हणाले.

5 भाषामध्ये हा चित्रपट आहे. पूर्ण भारतात आपण अशी विकृत विधाने पोहोचवून आपण काय साधणार आहोत असा थेट सवाल आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पावनखिंडच्या लढाईत या दोन्ही बंधुनी आपले प्राण दिलेत इतकंच नव्हे तर त्या नंतर सुद्धा बाजी प्रभुच्या सातही मुलांनी स्वराज्याची चाकरी केली, दांगट सुद्धा महाराजांचे कट्टर योद्धे होते.

स्वराज्याच्या लढाईत सामील व्हा नाही तर जीव द्या असे महाराज या चित्रपटात सांगताना दिसत आहे म्हणजे महाराजांनी सैन्य जमावली ते जबरदस्तीने असं यांना सांगायचं आहे का? आमचं साकडं राज साहेबांना सुद्धा आहे. त्यांनी याबदल निर्मात्यांना सुचवावा. महाराजांच्या आयुष्यावरील हा चित्रपट चालू नये अशी आमची पण इच्छा नाही असे आनंद दवे यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT