Independence Day 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Independence Day 2024: 'हर घर तिंरगा' प्राजक्ता माळीपासून ते सुबोध भावेपर्यंत; मराठी कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा

Marathi Celebrity Wishes News: सिनेसृष्टीतील अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Manasvi Choudhary

आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लेह- लडाखमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'हर घर तिरंगा' म्हणत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अत्यंत हटके स्टाईलमध्ये सोनालीने बाईकला तिरंगा लावून फोटो शेअर केले आहेत.

'७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.', अशी पोस्ट अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर डान्स करत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिरंगा रंगाचा खास ड्रेस तिने परिधान केला आहे. तिच्या डान्सचे कौतुक केले जात आहे.

अभिनेत्री पूजा सांवतने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत आहेत.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद!', अशी पोस्ट करून सुबोध भावेनं स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. अभिनेता प्रसाद ओकने '१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चिरायू होवो... जय हिंद...!!' अशी पोस्ट शेअर केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT