Parineeti Chopra Instagram/ @ parineetichopra
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Parineeti: फक्त अभिनेत्री नाही तर... कोट्यावधींची मालकीण आहे परिणीती चोप्रा

परिणीती आज ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Happy Birthday Parineeti: अभिनेत्री परिणीती चोप्राच्या (Parineeti Chopra) अभिनयाबद्दल सांगायचे तर आपल्या अभिनयाने चाहत्यांना चांगलेच वेड लावले आहे. चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करत असते. परिणीती आज ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. सोबतच बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या प्रियंका चोप्राची परिणीती चुलत बहिण आहे. त्या दोघीही अभिनय क्षेत्रात निपूण आहेत.

३४ वर्षीय परिणीतीचा जन्म पंजाबी - हिंदू कुटुंबात झाला असून परिणीतीचे वडिल व्यापारी आहेत तर आई सामान्य गृहिणी. सोबतच परिणीतीला दोन भाऊही आहेत. परिणीतीने आपले शिक्षण अंबाला येथेच पूर्ण केले. परिणीती लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे.

तिची अभ्यासातील प्रगती पाहता सोबतच अभ्यासातील जिद्द आणि चिकाटी पाहता वडिलांनी वयाच्या १७व्या वर्षी इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवले होते. तिने परदेशात आपले शिक्षण इंग्लंडमधील मॅंचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले.

परिणीतीने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. परिणीतीचे इन्वेस्टमेंट बॅंकर बनण्याचे स्वप्न होते. परिणीती मुंबईत येऊन यशराज फिल्म्समध्ये मार्केटिंग विभागात रुजू झाली. काम करताना प्रचंड सक्रिय असल्याने सर्वांच्या नजरेत आली. आदित्य चोप्राला तिच्यातील अभिनयाचे कौशल्य दिसून आल्याने तिच्याकडून तब्बल एक नाही तीन चित्रपट साइन करुन घेत परिणीतीने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली.

परिणीतीने जास्तीत जास्त संपत्ती चित्रपटातील कमाईतून मिळवली आहे. तसेच ती अनेक ब्रँडसाठी जाहिरात देखील करते. यातून ही तिला अफाट पैसा मिळतो. परिणीतीच्या घराची किंमत 22 कोटी असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

तसेच अभिनेत्रीकडे जॅग्वार, ऑडी, मर्सिडीज अशा अनेक आलिशान, लक्झरीयस कार असल्याचे दिसत आहे. परिणीती एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये इतके मानधन घेते. तिची एकूण संपत्ती 8 मिलियन डॉलर इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

SCROLL FOR NEXT