Ham 2 Hamare 12 Poster 
मनोरंजन बातम्या

'हम २ हमारे १२' चित्रपटाला मुस्लिम संघटनांचा विरोध

Ham 2 Hamare 12 Movie Controversy : 'हम २ हमारे १२' चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वी टीझर रिलीज झालेला आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच एका मुस्लिम संघटनाने प्रदर्शनावर विरोध केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही दिवसांपूर्वी 'हम २ हमारे १२' चित्रपटाचा (Ham 2 Hamare 12 Movie) पोस्टर रिलीज झालेला होता. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच खरंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. अशातच नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. टीझर रिलीज होताच चित्रपटाला पुन्हा एकदा एका धार्मिक संघटनाकडून विरोध करण्यात आला आहे. चित्रपटाला विरोध करण्यासाठी नाशिकच्या रझा अकादमीने बैठक घेतली होती. यावेळी बैठकीत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारे काही सीन्स या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. यामुळे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या चित्रपटाला विरोध केला जात आहे. देशभरात हा चित्रपट कुठेही रिलीज होऊ नये, अशी मागणी केली जात आहे. त्यासोबतच सोशल मीडियावरून टीझर आणि ट्रेलरही त्वरित डिलीट करण्यात यावा, अशी मागणी रझा अकादमीचे सदस्य सईद नुरी आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केली आहे. टीझर आणि ट्रेलर जर डिलीट झाला नाही तर, कायदेशीर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT