Hai Jawani Toh Ishq Hona Hai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: बॉलीवूडमध्ये खळबळ! 'या' जुन्या गाण्यावरून तब्बल ४०० कोटींचा कोर्ट खटला; धवन कुटुंबही अडचणीत?

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवनच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटावर वाशू भगनानी यांनी ४०० कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. गाण्यांच्या वापराबाबत गंभीर आरोप केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आगामी चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' प्रदर्शनापूर्वीच मोठ्या वादात अडकला आहे. ५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविरोधात प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून तब्बल ४०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

अलीकडेच चित्रपटातील ‘चुनरी चुनरी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. हे गाणे जुन्या लोकप्रिय गाण्याचे रिमेक असल्याने त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, याच गाण्यामुळे आता चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पूजा एंटरटेनमेंट (इंडिया) लिमिटेड’ने ‘टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड’, रमेश तौरानी, कुमार एस. तौरानी आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘चुनरी चुनरी’ तसेच ‘इश्क सोना है’ या गाण्यांच्या वापराबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.

वाशू भगनानी यांचा आरोप आहे की, संबंधित गाणी आणि काही सीन वापरण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. ऑरिजनल सीन वापरण्याचे अधिकार नसतानाही त्याचा वापर करून व्यावसायिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपटाचे वितरण, स्ट्रीमिंग आणि इतर व्यावसायिक वापरांवर बंदी घालण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

या खटल्यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी. वाशू भगनानी यांनी ‘है जवानी तो इश्क होना है’ हे शीर्षक बदलावे. याशिवाय १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT