Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

'सनम मेरे सनम...' म्हणतं गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पासोबत रोमँटिक डान्स, Bigg Boss म्हणाले…., पाहा VIDEO

Gunaratna Sadavarte-Shilpa Shirodkar Dance Video : बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांनी शिल्पा शिरोडकरसोबत भन्नाट डान्स केला आहे.

Shreya Maskar

बिग बॉस 18 (Bigg Boss 18) सध्या सर्वत्र खूप गाजत आहे. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून गुणरत्न सदावर्ते यांनी घरात धुमाकूळ घातला आहे. आपल्या वक्तव्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गुणरत्न सदावर्ते हे शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) सोबत घरात खूप मज्जा- मस्ती करताना पाहायला मिळतात. बिग बॉसच्या घरात शिल्पा शिरोडकरसोबत गुणरत्न सदावर्ते यांनी रोमँटिक गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. सारा या दोघांना डान्स शिकवत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

'सनम मेरे सनम' या गाण्यावर शिल्पा शिरोडकरसोबत गुणरत्न सदावर्ते यांनी भन्नाट डान्स केला आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte ) हे शिल्पा शिरोडकरचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या रोमँटिक डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सारा सदावर्तेंचा हात शिल्पाच्या कंबरेवर ठेवते. तेव्हा लाजून सदावर्ते कंबरेवरून हात काढतात आणि हसायला लागतात.

शिल्पा शिरोडकरसोबत गुणरत्न सदावर्ते यांनी डान्स करताना बिग बॉसही त्यांची मज्जा घेतात. बिग बॉस म्हणतात की, "तुम्ही खूप छान डान्स केला... तुमच्या पत्नी जयश्रीलाही डान्स आवडेल...फक्त जयश्री यांनी शिल्पावर केस केली तर तुम्हाला शिल्पाच्या बाजूने केस लढावी लागेल" हे ऐकताच सर्वजण हसू लागतात.

गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याची चर्चा सुरू आहे. कारण त्यांची हायकोर्टात एक केस सुरू आहे. केस संपल्यावर गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT