golden globe awards 2023 song naatu naatu get best original song awards  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Golden Globe Awards: आंतरराष्ट्रीय स्तरावर दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका, 'नाटू नाटू'ने गोल्डन ग्लोबमध्ये पटकवला पुरस्कार...

गेल्या वर्षात चर्चेत असणाऱ्या अनेक चित्रपटांना अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळत आहेत. सध्या ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसारख्या अनेक पुरस्कारांमध्ये चित्रपटांचे नाव झळकत आहेत.

Chetan Bodke

Golden Globe Awards: २०२२ हे वर्ष तर दाक्षिणात्य चित्रपटांसाठी एकदम खास तर होतेच पण २०२३ हे वर्ष देखील खास झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला गेल्या वर्षी बराच झाला होता. परंतू आता, सध्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात दाक्षिणात्य चित्रपटाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. RRR चित्रपटातल्या 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब हा पुरस्कार पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून हा पुरस्कार या गाण्याला देण्यात आला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एस.एस.राजामौली यांचे दिग्दर्शन असलेल्या या गाण्याने जगभरात आपला डंका वाजवला आहे. याच गाण्याने आता हॉलिवूडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला हा गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे. या चित्रपटाचा गाजावाजा परदेशात होत असल्याने हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मानाचा क्षण आहे. या चित्रपटाचे प्रतिनिधीत्व अवॉर्ड फंक्शनमध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांनी केले होते.

टेलर स्विफ्टचं कॅरोलिना, लेडी गागाचं होल्ड माय हँड या गाण्यांनाही गोल्डन ग्लोबमध्ये नामांकन होतं. त्यातून नाटू नाटू या गाण्याची सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात निवड करण्यात आली. RRR या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश चित्रपट या प्रकारातही नामांकन मिळालं आहे.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर RRR ने जागतिक स्तरावर 1200 कोटींहून अधिक कमाई केली होती. राजामौली यांनी याआधीच न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहेत. याशिवाय RRR ला ऑस्करच्या सर्व श्रेणींमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT