Manju Singh Death google
मनोरंजन बातम्या

बॉलिवूडला धक्का! 'गोलमाल' फेम मंजू सिंग कालवश

नरेश शेंडे

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री 'गोलमाल' फेम मंजू सिंग (Manju singh death) यांचं निधन झाल्यानं बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाऱ्याच्या झटक्यामुळं (heart attack) त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर आलीय. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूडमध्ये शोककळा (Bollywood) पसरलीय. टेलिव्हीजन शो निर्मात्या आणि अभिनेत्री म्हणून त्यांनी सिनेविश्वात आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

गीतकार, दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांनी ट्विटरवर त्यांचा एक फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय, मंजू सिंग राहिल्या नाहीत. दुरदर्शनसाठी 'स्वराज' शो लिहायचा होता. त्यावेळी मंजू सिंग यांनी दिल्लीहून मला मुंबईत आणलं. त्यांनी दूरदर्शनसाठी एक कहानी, शो टाईम इत्यादी शो केले. हृषीकेश मुखर्जींच्या गोलमालमधील रत्ना.. आमची लाडकी मंजू.. तुमचं प्रेम आम्ही कसं विसरु शकतो.. अलविदा! अशाप्रकारे शोक व्यक्त करत किरकिरे यांनी मंजू सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गोलमाल सिनेमात अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांचे कॉमिक सीन्सची आजही आठवण होते. या सिनेमात मंजू यांनी अमोल यांच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांनी या सिनेमात अप्रतिम अभिनय केलं आहे. गुलजार यांनी या सिनेमाचं संगीत आणि डायलॉग्स लिहिले आहेत. तसंच 'आनेवाला पल' हा सिनेमाही प्रेक्षकांना खूप आवडला होता.

मंजू सिंग यांनी 'स्वराज', 'एक कहानी', शो टाइम यांच्यासह अनेक अप्रतिम कार्यक्रम प्रोड्युस केले आहेत. तसंच त्यांनी लहान मुलांचा शो 'खेल खिलौने' मध्ये सूत्रसंचालनही केलं होतं. टीव्ही निर्मात्या म्हणून सिंग यांनी १९८३ मध्ये सुरुवात केली होती. २०१५ ला शिक्षण आणि क्रिएटीव्ह आर्ट्समध्ये त्यांनी भरीव योगदान दिल्यानं भारत सरकारकडून त्यांना सेंट्रल एडव्हायजरी बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT