Tanvi Thakkar - Aaditya Kapadia Become Parents Instagram @tanvithakker
मनोरंजन बातम्या

Tanvi Thakkar - Aaditya Kapadia Become Parents : सेलिब्रिटी कपलच्या घरी चिमुकल्याचे आगमन; फोटो शेअर करत दिली गोड बातमी

Celebrity Couple Become Parents : तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांच्या घरी चिमुकल्याचा आगमन झाले आहे.

Pooja Dange

Tanvi Thakkar - Aaditya Kapadia Blessed With Baby Boy : स्टार प्लस वाहिनीवरील सुपरहिट शो 'गुम है किसी के प्यार में' फेम तन्वी ठक्करच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्री आणि तिचा पती आदित्य कपाडिया आई-वडील झाले आहेत. दोघांचे हे पहिलेच अपत्य आहे. कपलने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांच्या घरी चिमुकल्याचा आगमन झाले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तन्वीचा फोटो शेअर करत मुलगा झाला असल्याचे सांगितले आहे. (Latest Entertainment News)

या दोघांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया पाळण्यातील मुलाला प्रेमाने पाहत आहेत. मात्र या कपलने बाळाचा चेहरा रिव्हील केला नाही. पोस्टमधील फोटो हॉस्पिटलमधला असल्याचे दिसत आहे. पोस्टसह कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, "19.06.2023... सर्व काही इथून सुरू होत आहे."

तन्वी ठक्करच्या पोस्टवर अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटींनी कमेंट करून तिला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पर्ल व्ही पुरी यांनी "खूप अभिनंदन" अशी कमेंट केली दिली. वहबिझ दोराबजी यांनी लिहिले, "मी माझ्या छोट्या राजपुत्राला कधी भेटतेय असं झालंय...मावशी खूप एक्साईटेड आहे."

तन्वीच्या पोस्टवर इशिता दत्तानेही कमेंट केली आहे, "तुला आणि बाळाला मिठी मारण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही... माझ्याकडून खूप प्रेम." इशिता दत्ता देखील लवकरच आई होणार आहे.

याशिवाय योगेंद्र विक्रम सिंह, किशोरी शहाणे, पूजा शर्मा, पलक सिधवानी, सुनयना फौजदार, जुही अस्लम, गौरव वाधवा, स्मृती खन्ना, हर्ष राजपूत, स्वाती वर्मा, किश्वर मर्चंट आणि समायरा राव यांनीही तन्वी आणि आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत. (Celebrity)

तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी 2014 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. सात वर्षांनंतर, या जोडप्याने 2021 मध्ये लग्न केले आणि आता एका मुलाचे पालक देखील झाले आहेत.

तन्वी गुम है किसी के प्यार या शोमध्ये शिवानी बुवाची भूमिका साकारत होती. तर आदित्य कपाडिया बालकलाकार म्हणून शक लाका बूम बूममध्ये झुमरूच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT