Ghar Banduk Biryani Shooting Complete  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ghar Banduk Biryani: बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिर्याणी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात प्रमुख कलाकारांची मांदियाळी...

'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची कथा काय असणार याची सर्व प्रेक्षकांनाच उत्सुकता वाढली आहे.

Chetan Bodke

Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. घोषणा झाल्यापासून चित्रपटाची कथा काय असणार याची सर्व प्रेक्षकांनाच उत्सुकता वाढली आहे. मात्र आता प्रेक्षकांना चित्रपटाची जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात पूर्ण झाले असून लवकरच 'घर बंदूक बिर्याणी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे एकत्र आल्यावर काहीतरी हटके विषय प्रेक्षकांसाठी घेऊनच येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ यावेळी वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

टीझरमध्ये, 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी पाहायला मिळणार. पोलीस आणि डाकूंची चकमक यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे? यातून काय निष्पन्न होणार?, हे चित्रपट पाहिल्यावर कळेल.

या चित्रपटाबद्दल निर्माते नागराज मंजुळे म्हणतात, "झी स्टुडिओसोबत काम केले असून काम करण्याचा अनुभवही अनोखा आहे. नुकतेच आमचे ‘घर बंदुक बिर्याणी’चे चित्रीकरण संपले असून एका बाजूला काम पूर्ण झाल्याचे समाधानही आहे आणि इतके दिवस एकत्र राहिल्याने थोडा भावनिकही झालो आहे."

"यात मी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. सयाजी शिंदे सारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करतानाचा अनुभव फार वेगळा आहे. आकाशसोबत मी याआधीही काम केले असून तो एक उत्तम कलाकार आहे. एखादी भूमिका साकारताना तो त्यात स्वतःला झोकून देतो. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच आम्ही प्रदर्शनाची तारीखही जाहीर करू."

हेमंत अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘घर बंदुक बिर्याणी’ नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT