Why Genelia Deshmukh didn't appear in the movie after marriage said the reason Instagram
मनोरंजन बातम्या

Genelia Deshmukh: लग्नानंतर अचानक गायब का झाली? जिनिलीयाने सांगितलं खरं कारण...

लग्नाच्या आधी अनेक सिनेमात झळकलेली जिनिलीया लग्नानंतर चित्रपटसृष्टीतून गायब झाली. अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे.

Chetan Bodke

Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील सर्वाधिक क्यूट कपल पैकी असलेले एक कपल म्हणजे रितेश- जिनिलीया. रितेश- जिनिलीया हे कपल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतंच. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने ७५ कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटातून सिनेसृष्टीत पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. लग्नाच्या आधी अनेक सिनेमात झळकलेली जिनिलीया लग्नानंतर चित्रपटसृष्टीतून गायब झाली. अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे.

रितेश- जिनिलीयाने नुकताच करिनाच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रितेश- जिनिलीयाने करिनासोबत मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या. लग्नाआधी अनेक सिनेमांमध्ये दिसलेली जिनिलीया लग्नानंतर का चित्रपटांमध्ये दिसली नाही, असा सवाल अनेकदा उपस्थित केला जात होता. सोबतच रितेशने जिनिलीयाला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मनाई केली होती का असा सवाल अनेकदा विचारला ही होता. आता याचं गुपित अखेर जिनिलीयाने सांगितले आहे.

जिनिलीया म्हणते, “लग्नाआधी मी हिंदी, तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत सक्रिय होते. मी लग्नानंतर करियरला जास्त महत्व न देता, लग्नाला सर्वाधिक जास्त महत्व दिले होते, तो माझा महत्वाचा निर्णय होता. लग्नानंतर जेव्हा मी कामातून ब्रेक घेतला तेव्हा अनेकांनी मला विविध प्रश्न विचारले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी माझी फिल्मी कारकीर्द संपवली, असं अनेकांनी गृहीत धरलं होतं. पण तसं काहीही नाही. तुला चित्रपटांमध्ये काम करायला रितेशने मनाई केलीये का? असा प्रश्न देखील मला अनेकांनी विचारला होता. तेव्हा दरवेळी एकच उत्तर द्यायचे की, नाही. मलाच दीर्घकाळ सिनेसृष्टीतून ब्रेक घ्यायचा आहे.” (Bollywood Film)

त्यानंतर रितेश म्हणतो, “कामातून ब्रेक घेणं हा पुर्णपणे तिचा निर्णय होता. तिला यापूर्वीच पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करायचं होतं पण कोरोनामुळे लांबलं. मी तिला अनेकदा सांगायचो की तुझं कॅमेऱ्यासमोर असणं तू मिस करत आहेस, त्यामुळे तू काम करायला सुरुवात कर.” आता जिनिलीया आणि रितेशचं हे वक्तव्य सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहे. रितेशने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ चित्रपटातून जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू केलं होतं. दोघांचा हा सिनेमा चांगलाट हिट ठरला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT