Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटीलचा ठसकेबाज डान्स अन् घायाळ करणाऱ्या अदा; 'सुंदरा' हे रोमॅंटिक गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil New Song: गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची माहिती लावणी डान्सर गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे कॅप्शन देत त्याने २ दिवसापूर्वी पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर या गाण्यात निकसोबत गौतमी असणार आहे. हे स्वतः गौतमीने सोशल मीडियावर सांगितले होते. टीझर पाहता गाण जबराट असणार आहे यात काही शंका नाही.

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत "सुंदरा" गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे यांची फ्रेश जोडी या गाण्यात झळकणार आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे. हे गाणं २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ आज एकाच व्यासपीठावर

Earing Designs: रोजच्या वापरासाठी कानातल्यांचे हे 5 ट्रेडिंग डिझाईन्स, मकर संक्रांतीला नक्की खरेदी करा

...अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील काही निर्णय चुकले', महेश लांडगे प्रकरणावर माजी आमदारांचं मोठं वक्तव्य

Valentine Day Love Letter: प्रिय मी..! मसला ये नही की... गम कितने है, मुद्दा ये है की... परवाह किसको है!

Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT