सबसे कॉतील गौतमी पाटील (Gautami Patil) ही सर्वांच्याच परिचयाची आहे. गौतमीने अत्यंत कमी वेळात नृत्यातील तिच्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशातच आता गौतमीने मराठी इंडस्ट्रीत तिचा प्रवास सुरू केला आहे. अलिकडेच गौतमी पाटीलचा चित्रपट लाईक आणि सबस्क्राइब रिलीज झाला या चित्रपटात गौतमीने अभिनेता अमेय वाघसोबत हटके डान्स केला आहे. आता अभिनेत्री स्टार प्रवाहावरील होऊ दे धिगांणा या कार्यक्रमात दिसणार आहे.
येत्या शनिवारी आणि रविवारी 'होऊ दे धिगांणा' Hou De Dhingana कार्यक्रमात गौतमी पाटीलची एन्ट्री होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ जाधव करत आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव म्हणतोय की, 'पहिल्यादांच स्टार प्रवाहावर येतेय तरूणांच्या मनात घर केलेली अदाकारी सबसे कातिल गौतमी पाटील'
सोशल मीडियावर गौतमीने याबाबतची माहिती दिली आहे. गौतमीने तिच्या पोस्टमध्ये होऊ दे धिगांणासाठी तिचा प्रवास कसा सुरू झाला ही व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. गौतमी होऊ दे धिगांणाच्या डान्स परफॉर्मन्सची प्रॅक्टीस करताना दिसतेय. सोशल मीडियावर गौतमीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.गौतमीच्या या व्हिडीओ सुप्रसिद्ध लावणीसम्राट अशिष पाटीलने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.