Sakhubai New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sakhubai Song: सबसे कातिल गौतमी पाटील थिरकणार सिद्धार्थ जाधवसोबत; आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित

Sakhubai New Song: ‘आतली बातमी फुटली' या चित्रपटातील गौतमी पाटील थिरकणार सिद्धार्थ जाधवचे सखूबाई हे पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sakhubai New Song: महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे ‘आतली बातमी फुटली' या चित्रपटातील सखूबाई हे पहिले धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारा धमाकेदार आयटम नंबर जल्लोषमय आहे.‘सबसे कातिल’ गौतमी पाटील आणि ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या गाण्यात चारचांद लावले आहेत. या गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. तर, चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेले हे गाणं सोनाली सोनावणे हिने गायले आहे.

‘हे आयटम सॉंग करताना आम्हाला खूप मजा आली असून प्रेक्षकांनाही हे आयटम साँग प्रेक्षकांना ठेका धरायला लावेल, असा विश्वास या दोन्ही कालाकारांनी व्यक्त केला. चित्रपटातील गौतमी पाटीलचा हॉट आणि सिद्धार्थ जाधवचा कूल अंदाज प्रेक्षकांसाठी भन्नाट तडका देणार आहे हे नक्की.

या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. 'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. 'आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेचा जेसीबी पाहताच संतापाचा स्फोट! संभाजीनगरमध्ये लाठीमार अन् हाणामारी, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Pune Crime: मला माहिती नाही माझ्या पत्नीचं काय झालं, खरपुडीमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार?

Maharashtra Politics: शरद पवारांना अजित पवारांचा दे धक्का; ३ टर्म आमदार असलेला बडा नेता राष्ट्रवादीत जाणार

Maharashtra Live News Update :नाशिक मध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Maharashtra Tourism: नैसर्गिक सुंदरता अन् अथांग समुद्रकिनारा, पालघरमधील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT