Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सुलतानच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन, सलमान खानने केली गणरायाची आरती; Video व्हायरल

Salman khan: दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खानच्या घरी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यावेळी अभिनेता सलमानने आरती केली दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. सलमान गणपती बाप्पामध्ये तल्लिन झाला असून सोशल मीडियावर अभिनेता सलमान खानचा व्हिडीओ समोर आला आहे. सलमानच्या कृत्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अभिनेता सलमान खान हा बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. यावेळी सलमान खानने बाप्पाचं दर्शन घेत आरती केली यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सलमान खान त्याच्या भाचीसोबत गणपतीची आरती करत आहे. व्हिडीओमध्ये , सलमानने तेथे असलेल्या सर्व लहान मुलांना आरती पकडण्यास सांगितले. सोशल मीडियावर 'भाईजान'च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर, भगवान गणपती आपणा सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्य, प्रेम आणि आनंद देवो... आणि हो, भरपूर मोदकही देवो.' सलमानच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.दरवर्षी सलमानच्या घरी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि संपूर्ण खान कुटुंबीय बाप्पाची मनोभावे पूजाअर्चना करतात. हीच प्रथा खान कुटुंबाने यावर्षीही कायम ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT