Sunny Deol Fees Instagram
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Fees: ‘गदर २’च्या अभूतपुर्व यशानंतर, सनी देओलने केली मानधनात घसघशीत वाढ, प्रसिद्ध अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

Sunny Deol News: चित्रपट समीक्षक व अभिनेता कमाल राशिद खानने ट्वीट करत ‘गदर २’ नंतर सनी देओल एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतोय, याची माहिती दिली आहे.

Chetan Bodke

Sunny Deol Fees

तारा सिंग अर्थात बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर २’ मुळे कमालीचा चर्चेत आला आहे. चित्रपटाला मिळत असलेला तुफान प्रतिसाद आणि त्याच्या अभिनयाची होत असलेली चर्चा पाहता, अभिनेत्याने आपल्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे.

चित्रपटाने फार कमी वेळेत यशाचे शिखर गाठले. सनीच्या ‘गदर २’ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने सनी देओलने त्याच्या मानधनात वाढ केल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

नुकतंच चित्रपट समीक्षक व अभिनेता कमाल राशिद खानने ट्वीट करत ‘गदर २’ नंतर अभिनेता एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतोय, याची माहिती दिली आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘गदर २’ फार कमी दिवसातच यशाचा शिखर गाठला आहे. चित्रपट भारतात ५०० कोटींच्या क्लबमध्ये कमाई करण्याच्या शर्यतीत असून चित्रपटाने जगभरात ५०० कोटींच्याही पुढे कमाईचा आकडा गाठला आहे. कमाईच्या बाबतीत चित्रपटाने शाहरुखच्या ‘पठान’चाही रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सनी देओलने आपल्या फीमध्ये वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल राशिद खान ट्विट करत म्हणतो, “एका निर्मात्याने सनी देओलची भेट घेतली आणि त्याला चित्रपट साइन करायला सांगितला. सनीने त्याच्याकडे ५० कोटी इतके एका चित्रपटासाठी मानधन आकारले.” केआरकेच्या या ट्वीटवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

सनी देओलच्या ‘गदर २’ बद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ४३० कोटींची कमाई केली आहे. तर ‘गदर २’ने जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून चित्रपटात मुख्य भूमिकेत सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT