Ranveer Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी? चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

Ranveer Singh Ban Controversy Don 3: बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह अडचणीत आला आहे. रणवीर सिंहवर बंदी घालण्याचा निर्णय चित्रपट संघटनेने घेतला आहे.

Priya More
  • बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी

  • चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

  • 'डॉन 3' चित्रपटातून बाहेर पडण्याचा रणवीरचा निर्णय

रोहित कदम, साम टीव्ही

बहुप्रतिक्षित 'डॉन 3' चित्रपटामुळे बॉलिवडूमध्ये नवा वाद निर्माण झालाय. तडफदार अभिनेता रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

गेल्या काही वर्षांपासून 'डॉन 3' हा चित्रपट कास्टिंग बदलांमुळे चांगलाच चर्चेत आलाय. मात्र, आता याच कास्टिंगबदलामुळे एका अभिनेत्याचं भवितव्य टांगणीला लागलंय. बहुप्रतिक्षित असलेल्या 'डॉन 3' चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंगने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. शूटिंग सुरू होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले असताना रणवीर सिंगने अचानक या चित्रपटातून काढता पाय घेतलाय. रणवीर सिंहच्या या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये कसं वादंग निर्माण झालाय पाहूयात...

काय आहे डॉन 3 चा वाद?

चित्रपट निर्माता फरहान अख्तर यांनी 2023 मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत डॉन 3 चित्रपटाची घोषणा केली होती. फरहान अख्तर हा चित्रपट होम प्रोडक्शन एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवत होते. 'डॉन 3' पुढे नेण्यासाठी फरहानने आपला दुसरा चित्रपट 'जी ले जरा' पुढे ढकलला. चित्रपट लांबणीवर पडल्याने रणवीर सिंह 'धुरंधर'मध्ये व्यस्त झाला. त्यानंतर 2026 मध्ये 'डॉन 3' चे चित्रीकरण सुरू होण्याआधीच अचानक रणवीर सिंहने चित्रपट सोडला.

आता चित्रपट निर्माता फरहान अख्तरने प्रोड्यूसर्स गिल्डमध्ये तक्रार करून 40 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केलीये. तर दुसरीकडे, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज म्हणजेच FWICEने रणवीर सिंहविरोधात बंदीचा ठराव मंजूर केला. तसेच, फेडरेशनने बॉलिवूडला रणवीर सिंगसोबत काम न करण्याचे निर्देश दिलेत. या प्रकाराने रणविरच्या करीअरवरही परीणाम होण्याची शक्यता आहे. कारण निर्माते आता त्याच्याबाबत सावध राहतील. दरम्यान फेडरेशनने घातलेल्या बंदीवर रणवीर सिंह काय भूमिका घेणार? आणि 40 कोटींची भरपाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

SCROLL FOR NEXT