Fussclass Dabhade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fussclass Dabhade: 'फसक्लास दाभाडे' 'या' तारखेला होणार प्रदर्शित; दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पोस्टर रिलीज

Fussclass Dabhade Movie: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

Manasvi Choudhary

झिम्मा २ च्या भरघोस यशानंतर आता अभिनेता हेमंत ढोमेचा नवीन चित्रपट येतो आहे. नुकतंच चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'फसक्लास दाभाडे' असं चित्रपटाचं नाव आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

हेमंतने त्याच्या सोशल मीडियावर नव्या सिनेमाचं पोस्ट रिलीज केलं आहे. त्यावर कॅप्शन देत त्याने म्हटलं की, आपल्या फसक्लास दाभाडे कुटूंबाकडून आपल्याला व आपल्या कुटूंबाला दिपावलीच्या फसक्लास शुभेच्छा! झिम्माच्या टीमचा नवा सिनेमा ‘फसक्लास दाभाडे’ 24 जानेवरी पासून तुमच्या जवळच्या फसक्लास चित्रपटगृहात!

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा चित्रपट माझ्या जीवनातील काही अनुभवांवर आधारित आहे. भावंडांची आणि त्यांच्या इरसाल कुटूंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल आपल्या नातेवाईकांची, सग्या सोयऱ्यांची आठवण करून देईल आणि आपण आपल्याच कुटूंबाची कथा मोठ्या पडद्यावर बघतोय असा अनुभव प्रेक्षकांना देईल याची मला खात्री आहे.”

निवेदिता सराफ, राजन भिसे, अमेय वाघ, राजसी भावे, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि हरिश दुधाणे या कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे. चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय आहे. चित्रपटात मुख्य भूमिका कोणाची याबाबतची माहिती अजून आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT