Official Promo  Instagram/ @zeemarathiofficial
मनोरंजन बातम्या

Fu Bai Fu: 'फू बाई फू'ने बोजा बिस्तारा आवरला, समोर आले 'हे' कारण

गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवर अनेक नव नवे आशयाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे 'फू बाई फू'. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग बराच मोठा आहे.

Chetan Bodke

Fu Bai Fu: गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवर अनेक नव नवे आशयाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे 'फू बाई फू'. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. 2010 या वर्षात सुरु झालेला हा कार्यक्रम अजूनही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत आहे. त्याची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायमच आहे. मराठीतील असे बरेच कार्यक्रम आहेत त्याचा प्रेक्षकवर्ग मराठीसह इत्यादी भाषिकही आहेत. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे, 'फू बाई फू'.

एके काळी 'फू बाई फू' हा कार्यक्रम काही नव्या- नवख्या विनोदवीरांना घेत सुरु केलेल्या या कार्यक्रमानं त्यावेळी अनेक मालिकांना आव्हान दिले होते. हे नवखे विनोदवीर आजही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात 'फू बाई फू'ने आपली दहशत निर्माण केली आहे हे बोलणे वावगे ठरणार नाही.

या कार्यक्रमाने अनेक भाग गाजवले आहेत. तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा नव्या कोऱ्या थीमसह कार्यक्रम वाहिनीने आणला तेव्हा हास्यरसिक भलतेच आनंदीत होते. कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हा सर्वत्र मोठा गाजावाजा केला गेला. पण आता बातमी समोर येतेय की कार्यक्रम अर्ध्यातच आवरता घेणार आहेत. चला थोडक्यात कारण जाणून घेऊया.

ओमकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पॅडी कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर आणि इ... अशा अनेक विनोदवीरांसह हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांपूर्वी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले होते. 'फू बाई फू' हा कार्यक्रम झी मराठीवर प्रसारित करण्यात येतो.

अवघ्या महिनाभरात कार्यक्रमाला गुंडाळले जात आहे, या बातमीला सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. खरं याचे कारण म्हणजे, झी मराठीवर नव्याने येऊ घातलेल्या दोन मालिका आणि 'फू बाई फू'ला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यक्रम बंद करण्याची सध्या वेळ आली आहे.

या कार्यक्रमामध्ये उमेश कामत आणि निर्मिती सावंत परिक्षक म्हणून आहेत, तर वैदेही परशुरामी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. 'फू बाई फू' हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर ३ नोव्हेंबर,२०२२ रोजी सुरू झाला होता. सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाची अखेरची शूटिंग ८ डिसेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे अशी चर्चा होत आहे.

अवघ्या काही दिवसांत 'फू बाई फू' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'फू बाई फू' च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असून त्यात अनेक मातब्बर कलाकार आपले जुने काही शो सोडून 'फू बाई फू' मध्ये आले होते. याची चर्चा बरीच सोशल मीडियावर होत होती. सध्या तरी म्हणावा तसा टीआरपी कार्यक्रमाला मिळत नाही म्हणून कार्यक्रम गुंडाळला गेला असावा असंच कारण समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT