Adnan Sami On Operation Sindoor Saam tv
मनोरंजन बातम्या

Adnan Sami: 'सिंदूर से तंदूर'; ऑपरेशन सिंदूरनंतर गायक अदनान सामीची प्रतिक्रिया, म्हणाला- स्वतःला वाचवा...

Adnan Sami On Operation Sindoor: गायक अदनान सामी याने भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Adnan Sami On Operation Sindoor: गायक अदनान सामी याने भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर अदनान सामी याने 'जय हिंद!! #OperationSindoor' असे ट्विट करत भारतीय लष्कराचे समर्थन केले

अदनान सामी याने 'सिंदूर से तंदूर तक' असा मजेशीर पोस्ट शेअर करत पाकिस्तानवर ताशेरे ओढले. त्यांनी पाकिस्तानी न्यूज अँकरवरही 'AAAAL IS WELLLL' असे म्हणत उपरोधिक टीका केली. या पोस्ट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.

अदनान सामी याने काही दिवसांपूर्वी अजरबैजानमध्ये भेटलेल्या पाकिस्तानी तरुणांबद्दल सांगितले. तो म्हणाला, "त्याने मला सांगितले की, 'सर, तुम्ही पाकिस्तान वेळेवर सोडलेत. आम्हालाही नागरिकत्व बदलायचे आहे. आम्ही आमच्या लष्कराचा तिरस्कार करतो.' मी उत्तर दिले, 'माझ्या हे आधीच लक्षात आले होते.'"

२०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवलेल्या अदनान सामी याने यापूर्वीही पाकिस्तानच्या धोरणांवर टीका केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर त्याच्या पोस्ट्सने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काहींनी त्याचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. तथापि, अदनान सामी याने आपल्या प्रतिक्रियांद्वारे भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईचे समर्थन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT