Famous Model Death: रशियातील प्रसिद्ध मॉडेल, मानसशास्त्रज्ञ आणि मिस युनिव्हर्स २०१७ मध्ये रशियाचं प्रतिनिधित्व करणारी स्पर्धक क्सेनिया अलेक्झांड्रोवा हिचं निधन झालं आहे. वयाच्या ३० व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे.चार महिन्यांपूर्वीचं तिचं लग्न झालेलं होत. तिचा हा अपघात तिच्या कुटुंबीयांसाठी आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.
५ जुलै २०२५ रोजी क्सेनिया तिच्या पतीसोबत गाडीने रशियाच्या ट्वेर ओब्लास्टमधील M9 महामार्गावरून प्रवास करत होती. अचानक रस्त्यावरून एक मोठं जंगली हरिण धावत आलं आणि गाडीच्या काचेला जोरदार धडक दिली. या धडकेत हरिणाचा पाय थेट काच फोडून आत शिरला आणि क्सेनियाच्या डोक्याला इजा झाली. अपघात इतका अचानक घडला की तिच्या पतीला काहीच सुचलं नाही. त्याने स्वतः सांगितलं की, "सगळं एका सेकंदात घडलं आणि मी काहीच करु शकलो नाही."
अपघातानंतर क्सेनियाला त्वरित मॉस्को येथील Sklifosovsky Institute for Emergency Medicine मध्ये दाखल करण्यात आलं. ती जवळपास एक महिना ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत होती. डॉक्टरांनी तिच्यावर सातत्याने उपचार केले, पण तिच्या मेंदूला झालेली इजा इतकी गंभीर होती की शेवटी सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. १२ ऑगस्ट २०२५ रोजी क्सेनियाचं निधन झालं.
क्सेनिया अलेक्झांड्रोवा हिचा जन्म १२ नोव्हेंबर १९९४ रोजी मॉस्को येथे झाला होता. तिनं २०१६ मध्ये Plekhanov Russian University of Economics मधून फायनान्सचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे २०२२ मध्ये Moscow Pedagogical State University मधून मानसशास्त्रात पदवी मिळवली. २०१७ मध्ये ती मिस रशिया स्पर्धेत उपविजेती ठरली आणि त्याच वर्षी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत रशियाचं प्रतिनिधित्व केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.