Urfi Javed Promotion Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Promotion Look: आगीचा स्टंट आला उर्फीच्या अगलंट, अर्धा ड्रेस अन् भुवया जळाल्या; VIDEO पाहाच

Urfi Javed Fire Look Video: ड्रेन्सिंग स्टाईलने आकर्षित करणारी उर्फी आतादेखील लक्ष वेधून घेते आहे. सोशल मीडियावर उर्फीचा लेटेस्ट लूक पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर इनफ्ल्युएन्सर उर्फी जावेदची लोकप्रियता अफाट आहे. अतरंगी स्टाईलमध्ये उर्फी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ड्रेन्सिंग स्टाईलने आकर्षित करणारी उर्फी आतादेखील लक्ष वेधून घेते आहे. सोशल मीडियावर उर्फीचा लेटेस्ट लूक पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

नुकतंच उर्फीने Follow Kar Lo Yaar या वेब सिरीजच्या प्रमोशनला उपस्थिती लावली. यावेळी उर्फीचा लूक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. उर्फीने ब्लॅक कलरचा बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे.केसांच्या हेअरस्टाईलसह उर्फीने ग्लॉसी मेकअप लूक केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ,उर्फी एका व्हाईट कागदी गोल आकाराच्या बॉक्सवर सरळ उभी आहे. अचानक हा बॉक्स पेट घेतो आणि ही आग वरच्या दिशेने पेट घेते.या माध्यमातून खरंतर उर्फी Follow Kar Lo Yaar या वेबसिरीजचं प्रमोशन करत आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केली आहे. ज्यामध्ये उर्फीचा हटके अंदाज नेहमीपेक्षा अधिकच वेगळा आहे. यामुळे उर्फी ट्रोल देखील होत आहे.

सोशल मीडियावर उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फीने नेहमीच तिचे अतरंगी लूक्समधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करते जे तुफान व्हायरल होतात. अनेकदा उर्फी यामुळे ट्रोलिंगचाही सामना करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT