Filmmaker Aditya Kripalani daughter Anuradha Pandey has passed away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Death News: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; कर्करोगामुळे लेकीचे निधन

Death News: चित्रपट निर्माते आदित्य कृपलानी यांच्या मुलगी अनुराधा पांडेचे स्टेज फोर कर्करोगामुळे निधन झाले. भावूक व्हिडिओ शेअर करत त्यांनी दुःख व्यक्त केले आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Shruti Vilas Kadam

Death News: चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य कृपलानी यांच्या मुलीचे, अनुराधा पांडेचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. मुलीच्या निधनामुळे आदित्य कृपलानी आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतः आदित्य यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या मुलीच्या निधनाची माहिती दिली. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी आणि कलाकार भावुक झाले असून, सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केला भावूक व्हिडिओ

आदित्य कृपलानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलगी अनुराधाबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते मुलीच्या निधनाची बातमी सांगताना भावूक झाल्याचे पाहायला मिळते. नेमके काय बोलावे, हे त्यांना सुचत नसल्याचेही व्हिडिओत दिसते. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी, 'आमच्यासाठी . @pandey.anuradha' असे लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी दुःख व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला आहे.

स्टेज फोर कर्करोगाशी सुरू होती झुंज

आदित्य कृपलानी यांनी व्हिडिओमध्ये मुलीच्या आजाराबद्दलही सांगितले, 'अनुराधाला स्टेज फोर ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. या गंभीर आजाराशी ती झुंज देत होती. मुलाला कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर पालकांच्या मनात अनेक आशा असतात. आपले मूल या संकटातून बाहेर पडेल आणि आपल्याला सोडून जाणार नाही, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जगात अनेकांनी कर्करोगामुळे आपली मुले, भावंडे आणि जवळची माणसे गमावली आहेत. मात्र, अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते, याची कल्पना कधीच नसते. आज आम्ही ज्या वेदनेतून जात आहोत, त्याच वेदनेतून यापूर्वी अनेक कुटुंबे गेली असतील, याची जाणीव आता होत आहे, असे ते म्हणाले.

आरोग्याची काळजी घेण्याचे केले आवाहन

या कठीण प्रसंगातून जात असतानाही आदित्य यांनी लोकांना आरोग्याबाबत महत्त्वाचा संदेश दिला. आपल्या आजूबाजूचे वातावरण, मानसिक आनंद, शारीरिक सवयी आणि आहाराकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. आरोग्याला प्राधान्य देऊन आवश्यक बदल करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger And Turmeric Drink: सकाळी आलं आणि हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Gold Price Today: सोन्याच्या दरात भलीमोठी घसरण! सोनं - चांदीचे भाव कोसळले, वाचा १८,२२ आणि २४ कॅरेटच्या किंमती

Political News: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने घातला गोंधळ, शिवीगाळ करत स्टेजवरून माईक अन् खुर्च्या फेकल्या; VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: 2029 नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका, कांद्यावर करपा रोगाचा प्रार्दुभाव

Accident News : विठुरायाच्या दर्शनाला जाताना वाटेत काळाने गाठले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT