69th Filmfare Awards Nomination (Year 2024) Complete List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Filmfare Awards 2024: फिल्मफेयर २०२४ मध्ये 'ॲनिमल'चीच हवा, सर्वाधिक नॉमिनेशन कोणाला मिळाले; वाचा संपूर्ण यादी

Filmfare Awards Nomination Full List 2024: ६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच नामांकने जाहीर झाली आहेत.

Chetan Bodke

Filmfare Awards Nomination 2024

६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच नामांकने जाहीर झाली आहेत. या यादीमध्ये शाहरुखच्या 'जवान', 'डंकी'ला नॉमिनेशन मिळालं असून 'पठान'ला नॉमिनेशन मिळालेलं नाही. या सोबतच रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटालाही नॉमिनेशन यादीमध्ये स्थान मिळाला आहे.

'६९ वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा २०२४' हा पुरस्कार सोहळा यावर्षी मुंबईमध्ये होणार नसून गुजरातमधील गांधीनगरमध्ये होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे करण जोहर, आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल होस्टिंग करणार आहे. येत्या २७- २८ जानेवारी २०२४ रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. नुकतीच नॉमिनेशन यादी जाहीर झालेली आहे. कोणकोणत्या चित्रपटांना या यादीत स्थान मिळालंय जाणून घेऊया.

बेस्ट फिल्म (Best Film)

१२ वी फेल, ॲनिमल, जवान, OMG 2, पठान, रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीमध्ये नॉमिनेशन मिळालंय.

बेस्ट डायरेक्टर (Best Director)

अमित राय यांना OMG 2 साठी, ॲटलीला जवानसाठी, करण जोहरला रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी, संदीप रेड्डी वांगा यांना ॲनिमलसाठी, सिद्धार्थ आनंद यांना पठानसाठी तर विधु विनोद चोप्रा यांना १२ वीं फेलसाठी नॉमिनेशन मिळालं आहे..

बेस्ट ॲक्टर (Best Actor)

शाहरुख खानला जवान आणि डंकीसाठी, रणवीर सिंहला रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी, रणबीर कपूर यांना ॲनिमलसाठी, सनी देओलला गदर २साठी तर विकी कौशलला सॅम बहादुरसाठी नॉमिनेशन मिळालं आहे.

बेस्ट ॲक्ट्रेस (Best Actress)

आलिया भट्टला रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी, भूमी पेडणेकरला थँक्यू फॉर कमिंगसाठी, दीपिका पदुकोनला पठानसाठी, कियारा अडवाणीला सत्यप्रेम की कथासाठी, राणी मुखर्जीला मिसेज चॅटर्जी नॉर्वेसाठी, तापसी पन्नुला डंकीसाठी नॉमिनेशन मिळालं आहे.

बेस्ट फिल्म क्रिटिक्स ...(Best Film Critics)

१२ वी फेल, भीड (अनुभव सिन्हा), फराज (हंसल मेहता), जोराम (देवाशिष मखीजा), सॅम बहादूर (मेघना गुलजार), थ्री ऑफ अस (अविनाश अरुण धावरे), झिग्वाटो (नंदिता दास)

बेस्ट ॲक्टर क्रिटीक्स...(Best Actor Critics)

अभिषेक बच्चन (घुमर), जयदीप अहलावत (थ्री ऑफ अस), मनोज वाजपेयी(जोराम), पंकज त्रिपाठी (ओएमजी २), राजकुमार राव (भीड), विकी कौशल (सॅम बहादूर), विक्रांत मेस्सी (१२ वी फेल)

बेस्ट ॲक्ट्रेस क्रिटिक्स..(Best Actress Critics)

दीप्ती नवल (गोल्डफिश), फातिमा सना शेख (धक धक), रानी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी नॉर्वे), सयामी खैर (घूमर), शहाना गोस्वामी (झिग्वाटो), शेफाली शहा (थ्री ऑफ अस)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT