Amitabh Bachchan Saam tv
मनोरंजन बातम्या

अमिताभ बच्चन यांचे नशीब बदलवणाऱ्या फिल्मसाठी 'या' सुपरस्टारला होती पहिली पसंती

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांची एवढ्या मोठ्या चित्रपटात निवड केली होती. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर बहुतेक लोक खूश नव्हते.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या ५२ वर्षाच्या कारकर्दीत अनेक यशस्वी चित्रपट केले. परंतु 'जंजीर' हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला नवं वळण देणारा चित्रपट मानला जातो. या चित्रपटातूनच अमिताभ बच्चन यांचं भाग्य बॉलीवूडमध्ये (Bollywood) चमकलं. त्यानंतर ते यशाच्या पायऱ्या चढतच गेले. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांची एवढ्या मोठ्या चित्रपटात निवड केली होती. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर बहुतेक लोक खूश नव्हते. कारण या चित्रपटासाठी सर्वांची पहिली पसंती धर्मेंद्र होते, असा खुलासा चित्रपट निर्माते पुनीत मेहरा (puneet mehra) यांनी केला आहे. ( puneet mehra on Amitabh Bachchan )

हे देखील पाहा -

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनीच 'जंजीर' ची स्क्रिप्ट प्रकाश मेहरांकडे आणली होती. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांना स्वतः जंजीरमध्ये मुख्य भूमिका करायची होती. मग नंतर या सिनेमाचे अचानकच फासे वळले ? चला तर जाणून घेऊयात. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तरी अमिताभ बच्चन यांना लोकप्रिय करण्यात धर्मेंद्र यांचीही मोलाची भूमिका होती. अलीकडेच, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, प्रकाश मेहरा यांचा मुलगा आणि चित्रपट निर्माते पुनीत मेहरा यांनी त्यांच्या वडिलांच्या आणि अमित बच्चन यांच्या अनेक किस्से आणि आठवणी सांगितल्या.

'धर्मेंद्र यांनीच 'जंजीर' ची पटकथा प्रकाश मेहरांकडे आणली होती. ती पटकथा वाचल्यानंतर प्रचंड आवडली होती. प्रकाश मेहरांसोबत धर्मेंद्र यांचा १९७२ साली आलेला पहिला चित्रपट 'समाधि' खूप गाजला. म्हणून अभिनेता धर्मेंद्रनीं प्रकाश मेहरांना 'जंजीर' ऑफर केला. परंतु धर्मेंद्र स्वतः दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. पण प्रकाश मेहरा यांना जंजीर सिनेमाची पटकथा इतकी आवडली की, त्यांना वाट पाहणे कठीण झाले होते. त्यामुळेच प्रकाश मेहरा यांनी धर्मेंद्र यांच्याकडून ही स्क्रिप्ट ३,५०० रुपयांना विकत घेतली', असे पुनीत मेहरा यांनी सांगितले.

'प्रकाश मेहरा यांनी ती पटकथा राजकुमारकडे नेली, पण त्यांना हैदराबादमध्ये एकट्यालाच चित्रिकरण करायचे होते, त्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी निवडले नाही. यानंतर प्रकाश मेहरा यांनी देव आनंद यांच्याशी संपर्क साधला. पण काही निष्पन्न झाले नाही', असे पुनीत यांनी सांगितले. पुढे पुनीत म्हणाले, 'ते याबाबत अनेक मुख्य कलाकारांशी बोलले, पण काही घडलं नाही. मग एकेदिवशी प्राण साहेबांनी माझ्या वडिलांना सांगितले की, तुम्ही एकदा 'बॉम्बे टू गोवा' बघा, तर कदाचित तुम्हाला त्यात 'जंजीर' सिनेमाचा हिरो दिसेल. त्यानंतर दोघांनीही एकत्र चित्रपट पाहिला आणि चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचे दृश्य पाहून माझे वडील खूश झाले आणि मोठ्याने ओरडले, 'मिल गया'. अशा प्रकारे 'अमिताभ बच्चन' यांची जंजीरसाठी निवड झाली.

प्रकाश मेहरा यांच्या त्या निर्णयावर बरीच टीका झाली...

पुनीत यांनी असंही सांगितले की, जेव्हा 'बिग बी' यांची चित्रपटात निवड झाली. तेव्हा लोकांनी त्यांच्या वडिलांनी चुकीचा निर्णय घेतला असे सांगितले. या चित्रपटात त्याने एका अयशस्वी अभिनेत्याची निवड केल्याचेही बोलले. कारण, त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा एकही चित्रपट गाजला नव्हता आणि त्यांची कारकीर्द अडचणीत आली होती. तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती गहाण ठेवून वडिलांनी मोठी जोखीम पत्करल्याचंही पुनीत यांनी सांगितले. पण १९७३ साली प्रदर्शित झालेला 'जंजीर' प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रचंड गाजला. कदाचित 'जंजीर' हा चित्रपट अमिताभ बच्चनसाठीच तयार केला गेला असावा, असंही पुनीत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT