Kuljit Pal Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kuljit Pal Passed Away: सुपरस्टार रेखाला बॉलिवूडमध्ये आणणाऱ्या निर्मात्याचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Kuljit Pal News: प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन झाले.

Chetan Bodke

Kuljit Pal Passed Away: बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी प्रसिद्ध निर्मात्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून कुलजित पाल आजारीच होते, २४ जून रोजी अर्थात काल हृदयविकाराच्या झटक्याने निर्मात्यांचे निधन झाले आहे.

कुलजीत पालचे व्यवस्थापक संजय बाजपेयी म्हणाले, "कुलजितजींना हृदयविकाराचा झटका आला होता. ते काही दिवसांपासून आजारी होते. अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Bollywood)

त्यांनी 'अर्थ', 'आज', 'परमात्मा', 'वासना', 'दो शिकारी' आणि 'आशियाना' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कुलजित पाल यांची मुलगी अनुप पाल देखील सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिला 'आज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात अनुप पाल आणि अक्षय कुमार देखील प्रमुख भूमिकेत होते. (Bollywood Film)

रेखाला दिलेला ब्रेक

कुलजीत पाल हे पहिले बॉलिवूड निर्माते होते, त्यांनी अभिनेत्री रेखाला एका चित्रपटामध्ये ब्रेक दिला होता. मात्र, काही कारणास्तव या चित्रपटाचं शूटिंग आणि काही कामं रखडली. पण कुलजित पाल यांच्या निमित्तानेच रेखा यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला, आणि पुढे मग बॉलिवूडला रेखाच्या रूपात एक दिग्गज अभिनेत्री मिळाली..

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत कुलजित पाल यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT