Fauji Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fauji Marathi Movie: सौरभ गोखलेचा धडाकेबाज ‘फौजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Fauji Marathi Movie Release Date: निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे निर्मित ‘फौजी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर आधारलेल्या ‘फौजी’ चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे या कलाकारांच्या भूमिका आहेत.

सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर आधारलेल्या ‘फौजी’ चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे या कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे असून सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. चित्रपटाचे विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस आहेत तर निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांनी केली आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ. शंकर तलबे, उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस.पी. गावडे, राजेंद्र कर्णे , प्रविण बुरुंगे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं याचे आहे.

शेतकरी कुटुंबातून ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांनी लिहली आहेत. चित्रपटाचे छायांकन मोहन वर्मा आणि संकलन विश्वजीत यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. चित्रपटातातील म्यूजिकची जबाबदारी राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार तर पार्श्ववसंगीत उमेश रावराणे, सूरज कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गायक शान, गायिका उर्मिला धनगर, वैशाली माडे आणि कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. चित्रपटामधील ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे निर्मिती प्रमुख महेश चाबुकस्वार असून त्याच्या वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्सने सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Usain Bolt : जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टला आता एक पाऊलही टाकणं जड जातंय,ऑलिम्पियन दिग्गज म्हणाला...

Crime: पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे दिले नाही, संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं; लातूर हादरले

GK: भारतातील 'असं' एकमेव राज्य जिथे आजपर्यंत रेल्वे सेवा पोहोचलेली नाही, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Jolly LLB 3 : 'जॉली एलएलबी 3'साठी अक्षय कुमारनं घेतले तगडं मानधन, इतर स्टारकास्टला किती मिळाले?

SCROLL FOR NEXT