Shahid Kapoor On Physical Abuse Instagram
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor New Movie: शाहिद कपूर साकारणार 'हे' ऐतिहासिक पात्र; लवकरच होणार शुटिंगला सुरुवात

Shahid Kapoor : सध्या शाहिद कपूर एका पौराणिक चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Shahid Kapoor Movie:

ब्लडी डॅडी आणि फर्जी मुळे प्रचंड प्रकाशझोतात आलेला शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रुपेरी पडद्यावरच नाही तर ओटीटीवर सुद्धा त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. सध्या शाहिद कपूर ‘जब वी मेट २’ सोबतच एका पौराणिक चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूर वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी यांच्यासोबत एका पौराणिक महाकाव्यावर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहिदने महाभारतातील कथेवर आधारित चित्रपटाला होकार दिला आहे. त्या चित्रपटामध्ये शाहिद कुंती पुत्र कर्णाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची २०२१ मध्येच घोषणा झाली असून तेव्हापासून चित्रपटावर काम सुरू आहे.

अद्याप चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालेली नसून येत्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पण या चित्रपटाबद्दल अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मुख्यबाब म्हणजे, सध्या अभिनेता दुसऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहिद लवकरच क्रीती सेनॉनसोबत एका रोमॅंटिक ड्रामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही. तर शाहिद रश्मिका मंदानाबरोबर एका कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

SCROLL FOR NEXT