Sajid Khan, Abdu Rozi and Farah Khan Instagram/ @farahkhankunder
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: फराहने 'या' दोन बिग बॉस स्पर्धकासोबत केली पार्टी, फोटो पोस्ट करत म्हणते...

Chetan Bodke

Bigg Boss 16: साजिद खान आणि अब्दु रोजिक नुकतेच 'बिग बॉस 16'च्या घरातून बाहेर पडले आहे. बिग बॉसच्या घरात असताना अब्दूला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही त्याला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. अलीकडेच प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खाननेही अब्दू रोजिक आणि साजिद खानसोबत खास फोटो शेअर केले आहेत. या दोघांनाही फराहनने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्याने खास पार्टी दिली आहे.

नुकताच फराह खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. फराहने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अब्दु आणि साजिद खान हे तिघंही एकत्र दिसत आहे. फोटोत फराह, अब्दुल आणि साजिद पोज देताना दिसत असून टेबलवर बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ठेवलेले आहेत.

तर, दुसऱ्या फोटोत अब्दू आणि फराह खास पोज देत फोटो काढताना दिसून येत आहे. या फोटोंसोबत फराह खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बिग बॉसच्या या सीझनमधील माझे आवडते स्पर्धक, फक्त आपले मन जिंकणे महत्वाचे आहे.' फराह खानच्या या पोस्टवर मलायका अरोरा, भावना पांडे आणि काश्मिरी शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय यूजर्सकडून रंजक फीडबॅकही येत आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'बिग बॉसच्या घरात तुमची नक्कीच आठवण येईल.' दुसर्‍या यूजरने लिहिले, 'चांगली बोलली फराह.' तर आणखी एक युजर म्हणतो, 'तुम्ही दोघांनी बिग बॉसच्या घरात आग लावली.' आणखी एक युजर म्हणतो, 'बिग बॉसच्या या सीझनमध्ये दोघांनीही चाहत्यांचे मन जिंकले आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT