Rajeshwari Kharat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat: 'दिग्दर्शकाने फोन केला की यायचंच...'; 'फँड्री' फेम राजेश्वरी खरात सोबत घडला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रकार

Rajeshwari Kharat Casting Couch : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘फँड्री’ या गाजलेल्या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने अलीकडे एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या काळातील कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.

Shruti Vilas Kadam

Rajeshwari Kharat Casting Couch : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘फँड्री’ या गाजलेल्या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने अलीकडे एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या काळातील कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर करत धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अंधारलेली बाजू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

राजेश्वरी म्हणाली की, 'फँड्री'सारख्या गाजलेल्या चित्रपटानंतरही तिला पुढे काही मोजक्या संधीच मिळाल्या. काही वेळा असे अनुभव आले जे आजही आठवले की मन अस्वस्थ होतं. त्या काळात एक दिग्दर्शकाने तिच्यासोबत कास्टिंग काऊचसारखा प्रकार करायचा प्रयत्न केला होता.

“फोन केला की यायचं”

हा अनुभव तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक होता. अभिनयात करिअर घडवण्यासाठी धडपड करत असताना असा दबाव टाकणं हे अत्यंत लाजिरवाणं असल्याचं तिनं नमूद केलं. ‘फँड्री’मधील शालू या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली होती. तरीही चित्रपटाच्या यशानंतर अपेक्षेप्रमाणे संधी मिळाल्या नाहीत. त्यानंतर सोशल मीडियावर तिची ओळख कायम राहिली, पण अभिनयात पुन्हा मोठं स्थान मिळालं नाही.

तिनं स्पष्ट केलं की,मी त्या दिग्दर्शकाचं नाव घेणार नाही पण त्या दिग्दर्शकाने मला कॉल करुन विचारलं, की कुठे आहेस? 'तसंच मी पुढे त्यांना विचारलं की, काय झालं? तो जोरात ओरडला आणि म्हणाला, 'तु मला विचारायचं नाही, मी सांगितलं ये की लगेच इथं येयचं'. चित्रसृष्टीत दिसणाऱ्या चमक-धमकपलीकडे एक अंंधारी बाजू आहे, जिथे महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यावा लागतो. अशा वागणुकीविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे.

राजेश्वरीचा हा अनुभव अनेक नवोदित कलाकारांसाठी शिकवण देणारा आहे. तिच्या धाडसाचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा रंगली असून, इंडस्ट्रीत याबाबत योग्य पावलं उचलावीत, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

फ्रिजमध्ये या 5 वस्तू कधीच ठेवू नका

SCROLL FOR NEXT