Prajakta Koli And Boyfriend Vrishank Khanal Engagement News Instagram/ @mostlysane
मनोरंजन बातम्या

Prajakta Koli Get's Engaged: अभिनेत्री प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Prajakta Koli Engagement News: प्रसिद्ध युट्यूबर आणि बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

Chetan Bodke

Prajakta Koli And Boyfriend Vrishank Khanal Engagement News

प्रसिद्ध युट्यूबर आणि बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. प्राजक्ताने रविवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. प्राजक्ता गेल्या अनेक दिवसांपासून बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. बॉयफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकत प्राजक्ताने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावर तिच्या अंगठीचा फोटो शेअर केला आहे. दोघांचाही हा खास रोमँटिक फोटो शेअर करत तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची घोषणा केली. “वृशांक आजपासून माझा एक्स बॉयफ्रेंड आहे” असं प्राजक्तानं सोशल मीडियावरील पोस्टला कॅप्शन दिलंय. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत, बरेच सोशल मीडिया एन्फ्लूएंसरने दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Bollywood News)

प्राजक्ता आणि वृशांक कॉलेजमध्ये एकत्र असल्यापासून एकमेकांना डेट करीत आहेत. प्राजक्ताचा बॉयफ्रेंड वृशांक हा पेशाने वकील आहे आणि प्राजक्ता पेशाने अभिनेत्री आहे. कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणारी ही जोडी आपल्या चाहत्यांना व्हिडीओच्या माध्यमातून भेटत असते. दोघांचंही एकमेकांच्या फॅमिलीसोबतचे नाते खूप सुंदर आहे. अनेकदा त्यांचं हे प्रेम आपल्याला व्हिडीओमधून पाहायला मिळतं.

दरम्यान, प्राजक्ता कोळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्राजक्ता गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जियो’ मध्ये मुख्य भूमिकेत होती. चित्रपटामध्ये प्राजक्ताने वरूण धवनच्या बहिणीचे पात्र साकारले होते. त्यामुळे तिला चाहते वरुण धवनची बहीण म्हणून देखील ओळखतात. प्राजक्ताने विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘नीयत’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लुएंसर म्हणून फेमस ठरलेली प्राजक्ता लवकरच लेखिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा हप्ता; २ दिवसात खात्यात जमा होणार ₹२०००

Homemade Face Mask: चमकदार आणि नितळ त्वचेसाठी घरच्या घरी फेस मास्क कसं बनवायचं?

Randeep Hooda: 'आज मी बाबा झालो...'; रणदीप हुड्डाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन, सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Maharashtra Live News Update : मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

SCROLL FOR NEXT