Famous Singer Death  google
मनोरंजन बातम्या

Famous Singer Death : प्रसिद्ध गायिकेचं निधन, संगीत विश्वावर शोककळा

Music Legend Death : श्रीलंकेच्या दिग्गज गायिका नंदा मालिनी यांचे ८२ व्या वर्षी निधन झालं. सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि आंदोलनांचा आवाज बनलेल्या त्यांच्या निधनाने श्रीलंकेच्या संगीतविश्वावर शोककळा पसरली.

Sakshi Sunil Jadhav

Nanda Malini Death : श्रीलंकेच्या प्रसिद्ध गायिका आणि सामाजिक- राजकीय विषयांवर ठाम भूमिका मांडणाऱ्या नंदा मालिनी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने श्रीलंकेच्या संगीतविश्वार शोककळा पसरली आहे. नावलामधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २३ ऑगस्ट १९४३ रोजी जन्मलेल्या मालिनी यांचा ८३वा वाढदिवस अवघ्या काही दिवसांवर आला होता.

नंदा मालिनी यांचा जन्म कालुतारा इथल्या एका गावात नऊ भावंडांच्या कुटुंबात झाला. त्या कुटुंबातील चौथ्या अपत्य होत्या. कोलंबोमध्ये शिक्षण घेत असताना १९५६ मध्ये त्यांनी कविता गायन स्पर्धेत विजय मिळवला. याच यशामुळे त्यांच्या संगीत कारकि‍र्दीची सुरुवात झाली.

१९७० आणि १९८०च्या दशकात मालिनी आपल्या सामाजिक आशयाच्या गीतांमुळे जास्त चर्चेत आल्या. भ्रष्टाचारावर उपहासात्मक भाष्य करणाऱ्या गीतांपासून ते अन्याय, अत्याचार आणि सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवणाऱ्या गाण्यांपर्यंत त्यांनी विविध विषय हाताळले. वांशिक आणि धार्मिक भेद बाजुला ठेवून एकजुटीने अन्यायाविरोधात उभं राहण्याचं आवाहन त्यांच्या गीतांमधून केलं जायचं.

त्या काळात श्रीलंकेत राजकीय अस्थिरता, बेरोजगारी, सामाजिक विषमता आणि जातीय तणाव वाढत होता. १९८३ मध्ये देशात गृहयुद्धाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मालिनी यांच्या काही गीतांवर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारणबंदी घालण्यात आली. मात्र त्यांच्या लोकप्रियतेवर त्याचा परिणाम झाला नाही.

१९८७ मध्ये प्रसिद्ध झालेला Pawana हा त्यांचा अल्बम मानवी हक्क आणि सरकारी दडपशाहीसारख्या विषयांवरच्या गीतांसाठी विशेष गाजला. आजही तो श्रीलंकेतील त्या अस्थिर काळाचा संगीतात्मक दस्तऐवज मानला जातो. २०२२ मध्ये आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी आंदोलन झालं. मालिनी यांनी या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आणि आंदोलकांसमोर सादरीकरणही केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT