RJ Simran Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

RJ Simran Death: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहने वयाच्या २५व्या वर्षी संपवलं जीवन, राहत्या घरी घेतला गळफास

RJ Simran Death: सिमरन सिंहने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सिमरन सिंह गुरूग्राममध्ये मैत्रिणीसोबत राहत होती. सिमरनने आत्महत्या का केली आहे याप्रकरणी तपास सुरू आहे.

Manasvi Choudhary

Entertainment News: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहने आत्महत्या केली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी तिने धक्कादायक पाऊल उचललं आहे. सिमरन सिंहच्या निधनाने कुटुंबियासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिमरन रेडिओ जॉकी म्हणून चांगलीच प्रसिद्ध होती.

मुळची जम्मूची रहिवासी असलेल्या सिमरनचा मृतदेह तिच्या गुरुग्राम येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सिमरनने आत्महत्या का केली आहे याप्रकरणी तपास सुरू आहे.

सिमरन सिंहने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सिमरन सिंह गुरूग्राममध्ये मैत्रिणीसोबत राहत होती. गुरूग्रामधील सेक्टर - 47 सोसायटीमध्ये तिने आत्महत्या केली आहे. तिच्या मैत्रिणीनीच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. बुधवारी रूमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सिमरनचा मृतदेह सापडला. गुरूवारी दुपारी ही घटना समोर आली असल्याने पोलिसांनी ताबडतोब या ठिकाणी दाखल झाले. गुरूवारी रात्री उशिरा पोलिसांनी सिमरनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. मात्र सिमरनने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सिमरन सिंह ही प्रसिद्ध आरजे आणि सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर आहे. मूळची जम्मू काश्मीरची सिमरन गुरूग्राममध्ये तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. सोशल मीडियावर तिचा लाखोंचा चाहतावर्ग आहे. नुकतंच १३ डिसेंबरला सिमरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिला जम्मूची धडकन म्हणून ओळखले जायचे. सिमनर ही रेडिओ मिरची या ठिकाणी आरजे म्हणून काम करत होती. ती २०२१ पर्यंत आर जे म्हणून काम करत होती. पण त्यानंतर तिने नोकरी सोडली. सध्या सिमरन फ्रिलान्सिंग म्हणून काम पाहायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT