Famous Actress Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Famous Actress Passed Away : मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. वयाच्या 82 वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले.

वयाच्या 82 वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्रीने टिव्ही इंडस्ट्री गाजवली.

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले. 'वन लाइफ टू लिव्ह' या लोकप्रिय सोप ऑपेरामध्ये 'कॅथी क्रेग लॉर्ड' ही भूमिका साकारणाऱ्या आणि ब्रॉडवे रंगभूमीवरील एक अनुभवी कलाकार असलेल्या जेनिफर हार्मोन (Jennifer Harmon ) यांचे निधन झाले. अभिनेत्रीने वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हार्मोन यांचे शनिवारी (९ मे) न्यूयॉर्क येथे निधन झाले. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

'द हॉलिवूड रिपोर्टर'च्या वृत्तानुसार, जेनिफर हार्मोन यांचे निधन झाले त्यावेळी त्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी या बातमीला दुजोरा दिला. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर हार्मोन यांचा जन्म ३ डिसेंबर १९४३ रोजी झाला. पासाडेना येथे जन्मलेल्या हार्मोन यांचे बालपण न्यू ऑर्लिन्समध्ये गेले. त्यांनी मिसिसिपी विद्यापीठ आणि मिशिगन विद्यापीठात शिक्षण घेतले होते.

करिअर

जेनिफर हार्मोन यांनी पाच दशके यशस्वी कामगिरी केली आहे. ब्रॉडवेवरील २१ नाटकांमध्ये काम केले.'वन लाइफ टू लिव्ह' यामधील अभिनेत्रीच्या कामासाठी त्यांना 'डे-टाइम एमी' (Daytime Emmy) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. जेनिफर हार्मोन यांनी १९६५ मध्ये, मॉस हार्ट आणि जॉर्ज एस. कॉफमन यांच्या 'यू कॅन्ट टेक इट विथ यू' या नाटकाच्या प्रयोगाद्वारे ब्रॉडवे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी चेकोव्ह यांचे 'द चेरी ऑर्चर्ड' आणि इब्सेन यांचे 'द वाइल्ड डक' या नाटकांच्या प्रयोगांमध्येही काम केले. त्यांच्या ब्रॉडवे कारकिर्दीत 'द स्कूल फॉर स्कँडल', नोएल कॉवर्ड यांचे 'ब्लाइथ स्पिरिट', वेंडी वासरस्टीन यांचे 'द सिस्टर्स रोझेनस्वेग', लिलियन हेलमन यांचे 'द लिटल फॉक्सेस' आणि टेरेन्स रॅटिगन यांचे 'द डीप ब्लू सी' या नाटकांचा समावेश होता.

अभिनेत्रीने याव्यतिरिक्त डेव्हिड हेअर यांचे 'एमीज व्ह्यू', नील सायमन यांची 'द डिनर पार्टी' आणि 'बेअरफूट इन द पार्क', टेनेसी विल्यम्स यांचे 'द ग्लास मेनेजरी', एडवर्ड अल्बी यांचे 'सीस्केप' आणि जॉन रॉबिन बेट्झ यांचे 'अदर डेझर्ट सिटीज' या नाटकांमध्येही अभिनय केला. टिव्हीच्या 'बार्नाबी जोन्स', 'डॅलस', 'द गुड वाईफ' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्या झळकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT