Raju Srivastava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तवला शुद्धीवर येण्यासाठी किती दिवस लागू शकतात?, डॉक्टर म्हणाले...

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात(AIMS Hospital) दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) अजूनही शुद्धीवर आलेला नाही. त्यामुळे चाहतेही चिंतेत आहेत. डॉक्टरांची टीम राजूच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे. या नवीन अपडेटमुळे चिंताग्रस्त झालेल्या त्याच्या चाहत्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळू शकेल.

राजू श्रीवास्तवला रुग्णालयात दाखल करून ५ दिवस झाले आहेत, परंतु अद्याप राजू शुद्धीवर आला नाही. नुकतेच राजूच्या कुटुंबीयांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याबरोबर तो उपचारांना प्रतिसाद देत आहे'. तसेच त्याच्या हार्ट ब्लॉकेजसाठी स्टेंट घालण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

१४ ऑगस्टला राजू श्रीवास्तवचा एमआरआय रिपोर्ट आला. या रिपोर्टनुसार, तणावामुळे राजूच्या मेंदूतील काही मज्जातंतू दाबल्या गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजूच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. राजूला बरे होण्यासाठी अजून १० दिवस लागतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तवची यापूर्वी दोनदा अँजिओप्लास्टी केली आहे. तसेच राजूच्या हृदयात ९ स्टेंट आधीच घालण्यात आले आहेत. यावेळी तिसऱ्यांदा ही अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना निकृष्ट आहार

Government Schemes : सरकारी योजनांवर VIDEO बनवा अन् कमवा तब्बल 1 लाख रुपये, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा

Vanita Kharat: फोन उचलताच बँक अकाऊंट रिकामं, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनीता खरातला हजारोंचा गंडा घातला; VIDEO चर्चेत

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

SCROLL FOR NEXT