Sophie Anderson Passed Away Saam tv
मनोरंजन बातम्या

Sophie Anderson Passed Away: प्रसिद्ध पॉर्नस्टारने घेतला जगाचा निरोप, काही दिवसांपूर्वी पतीचं झालं होतं निधन

Sophie Anderson Passed Away: प्रसिद्ध पॉर्नस्टारच्या निधनाचं वृत्त हाती आलं आहे. प्रसिद्ध पॉर्नस्टार सोफी एंडरसनचं वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sophie Anderson latest News:

प्रसिद्ध पॉर्नस्टारच्या निधनाचं वृत्त हाती आलं आहे. प्रसिद्ध पॉर्नस्टार सोफी एंडरसनचं वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालं आहे. सोफीच्या निधनाने तिच्या चाहत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

सोफी एंडरसनची जवळची मैत्रीण रेबेका जोन्सने तिच्या निधनाच्या वृत्ताबद्दल माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना तिच्या निधनाचं वृ्त सांगितलं आहे. रेबेकाने एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, 'सोफीच्या निधनाच्या वृत्तानं दु:ख झालं आहे. आम्ही एकमेकांसोबत एकत्र खूप वेळ घालवला आहे. मला नेहमी तिची आठवण येईल. ती खूप बडबडी, मस्करी करणारी , दयाळू होती. ती खूप हळव्या मनाची होती'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेबेकाने पुढे म्हटलं की, 'मी तिच्या खूप जवळची मैत्रीण होती. मला वेळोवेळी आठवण येईल. मी तिच्यावर नेहमी प्रेम करत राहील. तिच्यासाठी नेहमी हृदयात स्थान असेल'.

रेबेकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोफीच्या निधनानंतर तिचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. सोफीचा नेमका मृत्यू कसा झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

२ आठवड्यापूर्वी पतीचा मृत्यू

सोफीच्या पतीचं २ आठवड्यापूर्वी निधन झालं आहे. दोन आठवड्यातच पती-पत्नी अशा दोघांनी जगाचा निरोप घेतला आहे. सोफीच्या निधनानंतर तिचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सोफीच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT