Nitin Desai Life Journey  Instagram
मनोरंजन बातम्या

Nitin Desai Life Journey: 'ट्रकभर स्वप्नाचा' एका क्षणात शेवट, असा होता नितीन देसाई यांचा जीवनप्रवास

Nitin Desai Film Industry Journey: नितिन देसाई यांना '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे ओळख प्राप्त झाली होती.

Chetan Bodke

Nitin Desai Life Journey:

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. ५८ वर्षीय सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी आत्महत्या का केली या मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नितिन देसाईंच्या कामाबद्दल बोलायचे तर, त्यांचे शालेय शिक्षण मुलुंड येथील वामनराव मुरंजन हायस्कूलमध्ये मराठी माध्यमात पूर्ण झाले. सिनेसृष्टीत एन्ट्री करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतल्या सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्समधून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीसाठी सुरूवात केली. नितिन देसाई यांना '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे ओळख प्राप्त झाली होती. त्या चित्रपटानंतर नितीन देसाई यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' सारख्या चित्रपटांचे त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.

नितिन चंद्रकांत देसाईंच्या २० वर्षांच्या सिनेकारकिर्दित आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी आणि संजय लीला भन्साळी सारख्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नितीन देसाईंना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. सोबतच स्टार प्रवाहवर प्रदर्शित झालेली 'राजा शिवछत्रपती' या मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती. या मालिकेने महाराष्ट्रातील घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे.

बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर २००५ मध्ये नितिन देसाईंनी कर्जतमध्ये एन.डी. स्टुडिओची सुरू केला. हा स्टुडिओ जवळपास ५२ एकराच्या परिसरात पसरलेला आहे. दरम्यान, नितिन देसाईंनी आपल्या स्टुडिओत टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच खळबळ उडाली. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT