Famous Khandesh comedian Vijay Dagdu Pawar passes away saam tv
मनोरंजन बातम्या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यकलाकाराचं निधन; नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा

Comedian Vijay Dagdu Pawar Passes Away: खानदेशातील प्रसिद्ध हास्यकलाकार आणि अहिराणी कवी विजय दगडू पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विजय दगडू पवार हे खानदेशातील प्रसिद्ध हास्यकलाकार, अहिराणी कवी आणि क्रीडा शिक्षक होते.

Bharat Jadhav

  • प्रसिद्ध हास्यकलाकार विजय दगडू पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • धुळे जिल्ह्यातील सोनगीर हे त्यांचे मूळ गाव होते.

  • नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील शाळेत ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते.

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

खानदेशातील रसिकांना आपल्या विनोदी शैलीने आणि अहिराणी कवितांनी खळखळून हसवणारे प्रसिद्ध हास्य कलाकार विजय दगडू पवार यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नंदुरबार जिल्ह्यात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विजय पवार हे त्यांच्या अभिनयासोबतच मातृप्रेमाच्या एका अत्यंत हळव्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात ओळखले जात होते. पाहुयात त्यांचा हा जीवनप्रवास.

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील मूळ रहिवासी असलेले विजय दगडू पवार हे नंदुरबारकरांसाठी आपल्या घरचेच कलाकार होते. नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील एका शाळेत ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. कायम विनाअनुदानित तत्त्वावर काम करत असूनही त्यांनी आपले शिक्षक पेशाचे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावले. त्यांच्या निवृत्तीला अवघे दोन वर्षे शिल्लक होते.शाळेतील नोकरी सांभाळत असतानाच त्यांच्यातील कलाकार मात्र सदैव जागा होता.

एकपात्री प्रयोग, नाटके आणि अहिराणी साहित्य संमेलनांमध्ये त्यांची विशेष उपस्थिती असायची. त्यांची जवाई देखो तवा येतो अशीच करत ही अहिराणी कविता आणि सादरीकरणाची सहज शैली रसिकांमध्ये तुफान गाजली होती. त्यांचा चाहता वर्ग केवळ खानदेशापुरता मर्यादित नसून विदेशातही पसरलेला होता.

विजय पवार हे जितके उत्तम विनोदी कलाकार होते, तितकेच ते अत्यंत संवेदनशील पुत्र होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांना त्यांचा पाय कापावा लागला होता. आईच्या या असह्य वेदनांशी विजय पवार इतके एकरूप झाले की, त्यांनी स्वतःच्या पायात चप्पल घालणे कायमचे सोडून दिले. धक्कादायक आणि तितकीच भावूक करणारी गोष्ट म्हणजे, आईच्या निधनानंतरही त्यांनी आपला हा नियम मोडला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते अनवाणीच चालत राहिले.

नंदुरबारमधील डॉक्टरांनी तयार केलेल्या बटरफ्लाय चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. अहिराणी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर मोठ्या पडद्यावर (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये) झळकण्याचे त्यांचे स्वप्न शेवटपर्यंत अपूर्णच राहिले.

निवृत्तीनंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून रसिकांशी जोडलेले राहण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, काळाने त्यांचा हा नवा अध्याय सुरू होण्यापूर्वीच त्यांना हिरावून नेले. आज पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खानदेशने एक मनमिळाऊ, संवेदनशील आणि हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदी करताय सावधान! हॉलमार्क सोनंही बोगस असू शकतं

दादांची नाक रगडून माफी मागा; उद्धव ठाकरेंचा शाहांना टोला, पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण तापलं

MBBSसाठी NEETसोबत 12वीचे गुणही महत्त्वाचे? अनेक राज्यांचा निलेकणी समितीकडे प्रस्ताव

Maharashtra News Live Update: मायक्रो फायनान्सच्या एजंटची मुजोरी!

दिवाळीनंतर महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात मोठी वाढ; वाहनचालकांचे बजेट कोलमडलं!

SCROLL FOR NEXT