Bollywood Actress X Hack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress: प्रसिद्ध अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक; स्वत: पोस्ट करून चाहत्यांना दिली माहिती

Bollywood Actress X Hack: सलमान खानसोबत 'मातृभूमी' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिचे 'X' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट हॅक झाले आहे. तिने एका पोस्ट करुन तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Bollywood Actress X Hack: सध्या सोशल मीडिया हॅक होणे, त्यातून पैसे जाणे, फेक मेसेज जाणे या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेकांना यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. आता बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं आहे. त्यावर तिने लगेच कारवाई करत आपल्या चाहत्यांना तिचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. जाणून घेऊयात कोणासोबत हा प्रकार घडला आहे?

या अभिनेत्री सोशल मीडिया अकाउंट झालं हॅक

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सलमान खानची आगामी हिरोईन चित्रांगदा सिंग हिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आले आहे. चित्रांगदाने नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून ही महत्त्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिचे ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट हॅक झाल्याचे तिने सांगितले आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिली माहिती

चित्रांगदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीजवर ही माहिती देताना लिहीले की, हॅलो, माझे X अकाउंट हॅक झाले आहे. हे अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तोपर्यंत, X अकाउंटवरून पोस्ट होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये.

चित्रांगदाच्या कामाबद्दल

चित्रांगदा लवकरच सलमान खानसोबत ‘मातृभूमी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘मातृभूमी’ हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. या दिवशी भारतीय आणि चिनी सैन्यात झालेला संघर्ष देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. चित्रपटात सलमान खान कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT