Youtuber Killed Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Youtuber Killed: घरात घुसून 30 वर्षीय प्रसिद्ध युट्यूबरला संपवलं; मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने रचला कट, धक्कादायक कारण समोर

Youtuber Killed Case: फिटनेस यूट्यूबर मसूद चांदीची चांदीच्या खंजीराने भोसकून हत्या करण्यात आली. त्याच्या मेहुण्याने मित्रांच्या मदतीने घरात घुसून त्याची हत्या केली. पोलीस या हत्येमागच्या कारणाचा तपास करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Youtuber Killed: हैदराबादमधील गोलकोंडा येथे राहणाऱ्या प्रसिद्ध फिटनेस कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबरची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मसूद चांदी ऊर्फ शेख महबूब (SK Mahboob) या २५ वर्षीय युट्यूबरवर त्याच्याच घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काही जण महबूबच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी लोखंडी सळ्या, जिममधील साहित्य आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या महबूबला आरोपींनी रक्ताच्या थारोळ्यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. हल्ला इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात महबूबच्या पत्नीचा भाऊ शेख सोहेल हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सोहेलने त्याचे मित्र अफू आणि जाबीर यांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. तिघांनी मिळून महबूबवर वारंवार हल्ला करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अतिरिक्त डीसीपी कृष्णा गौड यांनी सांगितले की, आरोपी सोहेलला महबूबबद्दल आधीपासूनच गैरसमज आणि नाराजी होती. त्यातूनच त्याने मित्रांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा संशय आहे. हत्येमागील नेमके कारण आणि कटाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत. मृतकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT