famous Model Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shocking ! ते कारण ठरलं निमित्त अन्...; १९ वर्षांच्या प्रसिद्ध मॉडेलने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

famous Model Passes Away: अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १९ वर्षीय मॉडेलने आत्महत्या केली आहे. मॉडेलचा मृतदेह खोलीत आढळून आला त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Shruti Vilas Kadam

famous Model Passes Away: गुजरातच्या सूरत शहरात १९ वर्षीय मॉडेल सुखप्रीत कौर हिचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी उघडकीस आली असून, तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण मॉडेलिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. सुखप्रीत ही मूळची मध्य प्रदेशची रहिवासी असून, काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंगच्या प्रोजेक्टसाठी सूरतमध्ये आली होती.

सुखप्रीत सूरतच्या सरोली भागातील कुंभारिया गावात स्थित सारथी रेसिडेन्सीमध्ये तीन मैत्रिणीनंसोबत भाड्याने राहत होती. शनिवारी संध्याकाळी तिच्या रूममेटपैकी एक घरी परतल्यावर तिला सुखप्रीतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुखप्रीत घटनेच्या वेळी घरात एकटीच होती. तिच्या रूममेट्स त्या वेळी बाहेर गेल्या होत्या. पोलिसांनी तिचा मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच, तिच्या रूममेट्सचीही चौकशी सुरू आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा वाद होता का, हे स्पष्ट होऊ शकेल. सध्या पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, परंतु पोलिसांना कोणताही सुसाइड नोट सापडलेला नाही.

सुखप्रीतच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून, त्यांच्या सूरतमध्ये येण्याची पोलीस वाट पाहत आहे. ही घटना मॉडेलिंग क्षेत्रातील स्पर्धा, मानसिक आरोग्य आणि एकटेपणाच्या समस्यांमुळे झाले असल्याचे बोलण्यात येत आहे . पोलिसांनी सर्व अंगांनी तपास सुरू केला असून, कॉल डिटेल्स, सोशल मीडिया इंटरॅक्शन आणि पारिवाराचीही तपासणी केली जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT