Rohit Basfore Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rohit Basfore Death: मित्रांसोबत ट्रीपला गेलेला अन्..., 'फॅमिली मॅन 3' फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

Family Man Season 3 Actor Rohit Basfore : लोकप्रिय वेब सीरिज 'फॅमिली मॅन 3' चा अभिनेता रोहित बासफोर याचे निधनं झाले आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सुप्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीची 'फॅमिली मॅन' वेब सीरिजने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ही सीरिज कायम चर्चेत राहीली आहे. या वेब सीरिजमुळे कलाकारांना एक ओळख मिळाली आहे. अशात आता एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'फॅमिली मॅन सीझन 3 ' मध्ये असलेला अभिनेत रोहित बासफोर (Actor Rohit Basfore Death) याचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी रोहित मित्रांसोबत फिरायला गेला होता. त्यानंतर तो थेट मृतावस्थेत पाहायला मिळाला.

रोहित रविवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत गर्भांगा जंगलात फिरायला गेला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळला. आता याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. रोहितच्या कुटुंबाने अभिनेत्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रोहित काही महिन्यांपूर्वी त्याच्या गावी आसामला परतला होता. रविवारी दुपारी 12:30च्या सुमारास तो मित्रांसोबत पिकनिकला बाहेर पडला. रात्र झाली तरी रोहित घरी न आल्यामुळे कुटुंबाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण काहीच संपर्क झाला नाही.

रात्री रोहितच्या एका मित्राने रोहितच्या कुटुंबाला फोन करून त्याचा जंगलात अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचताच त्याचा मृत्यू झाला. रोहितच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर एसडीआरएफने रोहितचा मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी पुढे पाठवला आहे. रोहितच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

रोहित बासफोरचा मृतदेह गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला होता. रोहितच्या कुटुंबाने अभिनेत्याची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, रोहित बासफोर याचा अलिकडेच पार्किंगवरुन वाद झाला होता. रोहितच्या जीवाला रंजीत बसफोर, अशोक बसफोर, धरम बसफोर आणि जिम मालक अमरदीप यांच्यापासून धोका होता. यांनीच रोहितला ट्रीपला बोलावले होते. आता हे चारही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT