Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : 'फिनाले तिकीट घेऊन फक्त खुश रहा, ट्रॉफी तर...' बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने निक्कीला झापले!

Nikki Tamboli : तिकीट टू फिनाले जरी निक्कीला मिळालं असलं तरी अनेक लोक यामुळे खुश नाही आहेत. त्यामुळे तिच्याविषयी चर्चा सोशल मिडिया रंगली आहे.

Shreya Maskar

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बिग बॉसच्या शर्यतीत घरात सात सदस्य उरले आहेत. यात निक्की, वर्षा ताई, अंकिता, सूरज, अभिजीत, धनंजय दादा आणि जान्हवी हे स्पर्धक आहेत. नुकतेच निक्कीला 'तिकीट टू फिनाले' मिळाले आहे. मात्र यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत.

बिग बॉस मराठीचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रेक्षकांसोबत मराठी कलाकार देखील हा शो आवडीने पाहतात आणि आपली प्रतिक्रिया वेळोवेळी नोंदवतात. नुकतेच मराठी अभिनेत्री सुरेखा कुडचीने आपले मत व्यक्त केले आहे. तिने एक व्हिडीओ सोशल मिडिया शेअर केला आहे. ज्यात तिने सूरज बिग बॉस मराठीचा विजेता व्हावा अशी इच्छा व्यक्त करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे निक्कीला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज व्हावा असे अनेकांचे मत आहे. महाराष्ट्रातून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. सूरजने त्यांच्या वागणुकीने सर्वांच्या मनात घर केलं आहे. अशात आता मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी देखील सूरजला पाठिंबा दिला आहे. सुरेखा कुडची या स्वतः सुद्धा 'बिग बॉस मराठी 3' च्या स्पर्धक राहील्या आहेत. सुरेखा कुडची (Surekha Kudachi) व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, "पॅडी या आठवड्यात बाहेर पडलाय आणि आता फिनाले वीक सुरू आहे. सूरज चव्हाणने ( Suraj Chavan) 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी जिंकावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. याचा मला खूप मनापासून आनंद होईल. संपूर्ण माहाराष्ट्र तू ट्रॉफी घेऊ कधी बाहेर येतोस, याची वाट बघतोय. तुला खूप शुभेच्छा" असे म्हणतं सुरेखा यांनी सूरजला पाठिंबा दिला आहे.

सुरेखा कुडची शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी पुढे निक्कीला (Nikki Tamboli) सुनावले आहे. त्या म्हणाल्या की, "निक्की तू फिनाले तिकीट घेऊन फक्त खुश रहा. कारण ट्रॉफीपर्यंत तुला आम्ही जाऊ देणार नाही. ट्रॉफी तर सूरजचं जिंकणार. ऑल द बेस्ट सूरज!ट्रॉफी घेऊनच बाहेर ये..." 6 ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गोलीगत सूरज बिग बॉसची टॉफी उचलणार की पुन्हा निक्की बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

Maharashtra News Live Update: सुनील शेळके यांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना; अजितदादांच्या आठवणीने भावुक

BJP MLA Parag Shah : भाजप आमदार भिकाऱ्याच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय, सोशल मीडियावर Video व्हायरल

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT