Esha Deol Comment Dharmendra- Shabana Kissing Scene Saam Tv
मनोरंजन बातम्या

Esha Deol On Dharmendra- Shabana Kissing Scene: धर्मेंद्र- शबानाच्या किसिंग सीनवर लेक ईशाची प्रतिक्रिया; म्हणाली, आमच्यासाठी तो सीन म्हणजे...

Esha Deol Comment Dharmendra- Shabana Kissing Scene: चित्रपटातल्या किसींग सीनवर धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने प्रतिक्रिया दिली आहे, सध्या अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होतेय.

Chetan Bodke

Esha Deol Comment Dharmendra- Shabana Kissing Scene

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) यांच्या किसींग सीनची चर्चा अजूनही सुरुच आहे. चित्रपटात दोघांच्याही लव्हस्टोरी लक्ष वेधले आहे. चित्रपटामध्ये त्यांचा किसींग सीन असून त्या सीनमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय. या सीनवर सनी देओलसबोत अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच चित्रपटातल्या किसींग सीनवर धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने प्रतिक्रिया दिली आहे, सध्या अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होतेय.

ईशाने आपल्या वडीलांच्या किसींग सीनवर ‘फिल्मी ग्यान’ या वेबसाईटला दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणाली की, “मला त्या सीनबद्दल काहीही माहित नव्हतं. आमच्यासाठी तो सीन म्हणजे, एक सरप्राइज होते. दोघेही चित्रपटामध्ये खूपच प्रेमळ दिसत होते आणि मुख्य म्हणजे, ते दोघेही व्यावसायिक कलाकार आहेत.”

हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “मी अजून तो चित्रपट पाहिलेला नाही. पण प्रेक्षक त्या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यांच्या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला खूपच आनंद वाटतोय. त्यांना कॅमेऱ्यासमोर राहायला नेहमीच आवडते.”

सोबतच यावेळी त्यांना मुलाखतीमध्ये तुम्ही देखील ऑनस्क्रिन किसिंग सीन करणे सोईचे आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हेमा मालिनी यांनी आपणही किसिंग सीन करायला तयार असल्याचे सांगितले.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ एकंदरीत चित्रपटाबद्दल सांगयचे तर, मुख्य भूमिकेमध्ये आलिया आणि रणवीरसह शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले असून निर्मिती करण जोहर, हिरो जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण १४७. ७५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT