rajpal yadav cheque bounce case  meta ai
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांसमोर भावूक झाला राजपाल यादव, आता काय म्हणाला?

cheque bounce case: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हजर झाला. न्यायाधीशांनी त्यांचा 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट स्वीकारला आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदत दिली आहे.

Saam Tv

करोडो रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला बुधवारी सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. बुधवारी सुनावणीदरम्यान राजपाल यादवने 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयासमोर सादर केला आणि उर्वरित 85 लाख रुपये जमा करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत मागितली.

या सुनावणी दरम्यान सरन्यायाधिशांच्या समोर दु:ख मांडत असताना राजपाल यादव अत्यंत भावूक झाले. 2010 मधील 'अता पता लापता' या चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या चित्रपटामुळे माझे 17 कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या 13 वर्षांपासून काही लोकांनी माझा चित्रपट बनू दिला नाही . तसेच त्यांनी स्वतःच्या 5 कोटींच्या वादापोटी माझे 22 कोटी रुपयांचे नुकसान केले.

स्वत:ची बाजू मांडताना ते पुढे म्हणाले, सुरुवातीला मला 100 कोटी रुपयांचा माणूस म्हटले गेले आणि नंतर न्यायालयात खेचण्याची धमकी दिली गेली. मी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आलो आहे, पण आज मी स्वत:च एक 'ड्रामा' बनलो आहे. आता मला पुन्हा काम मिळू लागले असून मी सर्वांचे पैसे परत करेन.

यावर सरन्यायाधीशांनी गंमतीने त्यांच्याशी बोलताना म्हणाले, तुमच्या चित्रपटांप्रमाणे तुमचे पैसेही 'अता पता लापता' झाले आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने त्यांना पुन्हा चांगल्या चित्रपटांची निर्मिती करून लोकांचे मनोरंजन करण्याचा सल्ला दिला.

हे प्रकरण 'मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड'शी संबंधित असून दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात राजपाल यादव यांना दोषी ठरवले होते. वारंवार आदेश देऊनही रक्कम जमा न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या सुनावणीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु, आता 1.15 कोटी रुपये जमा केल्याची दखल घेत न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने उर्वरित पैशांची रक्कम जमा करण्याची राजपाल यादव यांना दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

Car on 20000 salary: दरमहा 20 हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घेण्याचा विचार कराल?

Pitru Paksha : पितृपक्षात बनवा मूग डाळीची स्वादिष्ट खिचडी, 'या' टिप्सने चव होईल दुप्पट

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: दादांच्या जाण्याने माझ्या घरावर आभाळ कोसळलं-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT