मुंबई: राज्यात भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष चांगलाच पेटला आहे. एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत आज चार वाजता पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ED) अचनाक मुंबईत (Mumbai) धाडसत्र सुरु केलं आहे. ईडीने आज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधीत अनेक मालमत्तांवर छापा टाकला आहे. यात हसीना पारकर (Haseena Parkar) यांच्याची घरावर ईडीने आज छापा टाकला. अंडरवर्ल्ड (Underworld) डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या (Mumbai) सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. (ED Raids At Residence Of Haseena Parkar, Read Who Was Haseena Parkar)
हे देखील पहा -
कोण होत्या हसीना पारकर?
हसीना पारकर या दाऊद इब्राहिमच्या लहान बहीण होत्या. हसीना पारकर यांचं निधन जुलै 2014 मध्ये मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झालं होतं. 51 वर्षीय हसीनाला 'हसीना आपा' आणि 'अंडरवर्ल्ड क्वीन' या नावांनी ओळखलं जायचं. आपली मुलगी आणि मुलगा अलीशाह यांच्यासह त्या नागपाडाच्या गॉर्डन हाऊस बिल्डिंगमध्ये राहायच्या. ही बिल्डिंग पोलीस स्टेशनच्या अगदीच समोर होती. हसीना यांच्या मृत्यूनंतर काही लोकांना वाटलं होतं की, दाऊद भारतात परत येईल पण असं झालं नाही. 1991 साली हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरचा खून झाला होता, त्यानंतर हसीना पारकर या मुंबईच्या हसीना आपा झाल्या. दाऊदच्या नावामुळे मुंबईत त्यांची दहशत होती.
पहा हसीना पारकर चित्रपटाचा ट्रेलर (Haseena Parkar Movie Trailer):
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते त्या बिल्डर लोकांकडून कमिशन घ्यायच्या. बिल्डरांना झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी बिल्डिंग्स उभ्या करण्यासाठी त्या मध्यस्ताचं काम करायच्या. पोलिसांना संशय होता की, त्या दाऊदच्या नियमित संपर्कात होत्या आणि त्यांची दुबईत-कराचीत दाऊदशी अनेकदा भेट झाली. दोन गटांमध्ये मांडवली करणे, वसूली, खंडणी असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले होते, पण दाऊदच्या भितीपोटी कुणीही त्यांच्याविरोधात बोलायचं धाडस करत नसे. पोलिसांनी एकदा हसीना यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता पण तेव्हा त्यांनी पोलीस आणि कोर्टाला सांगितलं की, इब्राहिमचा खून झाल्यानंतर त्यांनी कधीही दाऊदशी संपर्क साधला नाही. हसीना यांच्या जीवनावर आधारीत २०१७ साली हसीना पारकर नावाचा सिनेमाही आला होता, ज्यात श्रद्धा कपूरने हसीना पारकरची भुमिका साकारली होती.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.