Jacqueline Fernandez ED Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित प्रकरणात जॅकलिनने दाखल केलेल्या ‘सरकारी साक्षीदार’ बनण्याच्या अर्जाला विरोध केला आहे. पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने अभिनेत्रीवर गंभीर आरोप करत तिच्या या अर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांच्या एकलपीठात ईडीने सांगितले की, जॅकलिनला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पूर्ण माहिती होती. असे असूनही ती त्याच्या संपर्कात राहिली आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू आणि पैसे स्वीकारत राहिली. एजन्सीनुसार, या भेटवस्तू मनी लाँड्रिंगमधून मिळालेल्या पैशांतून खरेदी करण्यात आल्या होत्या.
ईडीने न्यायालयात स्पष्ट केले की, जॅकलिन स्वतःला ‘पीडित’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असली तरी तपासातील पुरावे वेगळीच बाजू मांडतात. अभिनेत्रीने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या फायद्यासाठी आणि ऐषारामीसाठी या पैशांचा वापर केला, असा दावा एजन्सीने केला. त्यामुळे तिला सरकारी साक्षीदाराचा दर्जा देणे योग्य ठरणार नाही, असे ईडीचे म्हणणे आहे.
तपासादरम्यान अभिनेत्रीने सातत्याने दिशाभूल करणारी माहिती दिल्याचाही आरोप ईडीने केला. अनेक वेळा नोंदवलेल्या जबाबांमध्ये तिने पूर्ण आणि सत्य माहिती दिली नसल्याचे एजन्सीने नमूद केले. तसेच, लेखिका अद्वैता काला यांच्याशी संबंधित व्यवहार, कुटुंबीयांच्या खात्यांमध्ये झालेली आर्थिक देवाणघेवाण आणि इतर आर्थिक व्यवहारांबाबत तिने महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला.
ईडीने न्यायालयात म्हटले की, जॅकलिन ही या प्रकरणात केवळ गौण सहभागी नसून ‘गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांची प्रमुख लाभार्थी’ आहे. त्यामुळे तिचा सरकारी साक्षीदार बनण्याचा अर्ज हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मे रोजी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.