Hyderabad Theatres News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hyderabad Theatres News : थिएटरमध्ये महिला प्रेक्षकाची अभिनेत्याला मारहाण, VIDEO होतोय व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

Viral Video : चित्रपटादरम्यान थिएटरमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय,जाणून घ्या.

Shreya Maskar

बरेच लोक चित्रपटाशी भावनिकरित्या खोलवर जोडले जातात. त्यामुळे त्यांना वास्तव्याचे भान राहत नाही. ते विसरून जातात की हा एक चित्रपट आहे. चित्रपटातील हिरोवर ती लोक खरचं प्रेम करू लागतात. तर चित्रपटातील खलनायकाचा राग करतात. अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे.'लव्ह रेड्डी' चित्रपट पाहायला गेलेल्या महिलेला प्रेक्षकांने थिएटरमध्येच गोंधळ घातला आहे.

'लव्ह रेड्डी' या साऊथ चित्रपटात अभिनेता एनटी रामास्वामीव( NT Ramaswamy) हे खलनायिकेच्या (Villain) भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ही चित्रपटातील खलनायिकेची भूमिका पाहून थिएटरमध्ये एका महिलेला तिचा राग अनावर झाला आहे आणि त्यातून त्या महिला प्रेक्षकांने अभिनेत्याला बेदम मारहाण केलेली पाहायला मिळत आहे. थिएटरमधील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आजूबाजूच्या लोक हा प्रकार थांबवताना दिसत आहेत. हा प्रकार हैदराबादमधील (Hyderabad Theatres News) एका थिएटरमध्ये घडला.

'लव्ह रेड्डी' चित्रपट रामास्वामी हा प्रेम करणाऱ्या जोडप्यामध्ये येताना दिसत आहे. याचा प्रचंड राग त्या महिलेला येतो आणि ती त्या अभिनेत्याला मारते. चित्रपटाचे स्क्रीनिंग झाल्यावर सर्व कलाकार जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा हा प्रकार घडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यावर अनेक कमेंट्सही येत आहे. एका युजरने लिहिलं की, "चित्रपटात एवढंही गुंतू नये." या महिलेने थिएटरमध्ये खूप आरडाओरडा केला. तिला थांबवण्यासाठी अनेक कलाकारही पुढे आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; 'या' 9 उमेदवारांना मिळणार संधी | Video

Maharashtra News Live Updates : पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसकडून रमेश बागवे यांना उमेदवारी

Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा विधानसभेसाठी पेच कायम; महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना

VIDEO : मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का? माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी शिंदे गटात करणार प्रवेश

Sharad Pawar NCP 3rd Candidate List : परळीत शरद पवारांचे मराठा कार्ड, धनंजय मुंडे यांच्याविरोधात दिला तगडा उमेदवार; तिसऱ्या यादीत कोणाला संधी?

SCROLL FOR NEXT