Pathaan Movie Poster  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Release Date: 'पठान' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, केआरकेचा दावा खरा ठरणार का?

'पठान' चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नसल्याचे म्हटले जात आहे.

Pooja Dange

Pathaan Movie Release Get Postponed: 'पठान' चित्रपटवरून देशभरात गदारोळ निर्माण झाला होता. या चित्रपटाला वेगवेगळ्या स्थरावर विरोध करण्यात आला. शाहरुख खान आणि दीपिका यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. परंतु आता या चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. 'पठान' चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नसल्याचे म्हटले जात आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे असल्याचे सांगण्यात आले होते. यशराज प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

स्वयंघोषित समीक्षक केआरके यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'पठान' चित्रपटावरून होणारे वाद पाहता निर्माते या चित्रपटाची रिलीज डेट पुढे नेऊ शकतात. यासोबतच चित्रपटात दीपिका 'भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसणार नाही' तसेच चित्रपटाचे नावही बदलू शकते. केआरकेच्या म्हणण्यानुसार, निर्माते आज किंवा उद्या याची घोषणा करू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे वर्ल्ड वाईड प्रदर्शन होणार नाही. कोविडमुळे असं निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. तसेच जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

आपल्या देशातही कोरोनाची चर्चा होत आहे. येत्या काळात जर पुन्हा रुग्ण कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली तर शाहरुख खानच्या या कमबॅक चित्रपटासाठी प्रेक्षक जास्त प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. जर पुढील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढले तर चित्रपट प्रदर्शित होणार नाही. म्हणजेच २५ जानेवारीला प्रेक्षकांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येणार नाही.

चित्रपट निर्मात्यांकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दीपिका आणि शाहरुख हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच आतुर आहेत. शाहरुख खानचा २०१८ ला झिरो चित्रपट प्रदरहित झाला होता. त्यानंतर ४ ते ५ वर्षांनीही शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करत आहे. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे फॅन खूप उत्सुक आहेत. परंतु प्रेक्षकांना आणि फॅन्सला चित्रपट पाहणायसाठी अजून काही दिवस थांबावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT